अमरावती : कोनासीमा जिल्ह्यात मंगळवारी संतप्त आंदोलकांनी आमदार पोनडा सतीश यांचे घर पेटवून दिले. आंदोलक डॉ बी आर आंबेडकर कोनासीमा जिल्हा म्हणून जिल्ह्याच्या नामकरणाला विरोध करत आहेत. परिवहन मंत्री पी विश्वरूप आणि आमदार पोनडा सतीश यांच्या घरांचे संरक्षण करण्यात पोलिसांना अपयश आले.
अमलापुरम आणि कोनसीमा जिल्ह्यातील काही भागात कायदा आणि सुव्यवस्था नसल्याचे दिसते. दुसरीकडे, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अमलापुरममध्ये गोळीबार केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मोटारी, फर्निचर आणि इतर मौल्यवान वस्तूंसह काही वाहने या ठिकाणी पेटवून देण्यात आली.
#WATCH | MLA Ponnada Satish's house was set on fire by protestors in Konaseema district in Andhra Pradesh today, the protests were opposing the naming of the district as Dr BR Ambedkar Konaseema district pic.twitter.com/XzJskKqhz3
— ANI (@ANI) May 24, 2022
आंध्र प्रदेशातील कोनासीमा जिल्ह्याचे नाव बदलून बीआर आंबेडकर असे करण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात मंगळवारी जिल्हा मुख्यालयात निदर्शने करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर राज्याच्या अमलापुरम शहरात जाळपोळ झाल्याची घटना घडली.
लाठीचार्ज केल्यानंतर आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. परिवहन मंत्री पी. विश्वरुपू यांच्या कार्यालयावरही हल्ला करण्यात आला आणि तेथे ठेवलेल्या फर्निचरची तोडफोड करण्यात आली.
4 एप्रिल रोजी पूर्व गोदावरी जिल्ह्यापासून कोनसीमा जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. गेल्या आठवड्यात, राज्य सरकारने कोनसीमा जिल्ह्याचे नाव बदलून बीआर आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यासाठी प्राथमिक अधिसूचना जारी करून लोकांकडून हरकती मागवल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर कोनसीमा साधना समितीने नाव बदलण्याच्या प्रस्तावावर आक्षेप घेत जिल्ह्याचे नाव कोनसीमा असेच ठेवण्याची मागणी केली.
जिल्ह्याचे नाव बदलण्याच्या विरोधात जिल्हा दंडाधिकारी हिमांशू शुक्ला यांना निवेदन देण्याचा प्रयत्न करत असताना मंगळवारी समितीने निदर्शने केली होती.
पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केल्यावर आंदोलक संतप्त झाले आणि अखेर शांत अमलापुरममध्ये जाळपोळ झाल्याची घटना घडली.