मुंबई : देशात कोरोना विरुद्ध सुरु असलेली लसीकरण मोहीम वेगाने प्रगती करत आहे. जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेने सोमवारी आणखी एक विक्रम केला. आतापर्यंत देशातील एकूण लसीकरणाचा आकडा 75 कोटींच्या पुढे गेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) भारताच्या लसीकरणाच्या वेगाचं कौतुक केलं आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की भारताने केवळ 13 दिवसात 65 कोटीपासून 75 कोटींचा आकडा गाठला आहे.
भारतात, सुरुवातीला 10 कोटी डोस 85 दिवसात घेतले गेले, त्यामुळे कोरोना लसीकरणाची सध्याची गती महत्वाची आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीट करून लसीकरणाची माहिती दिली. त्यांनी लिहिलं, 'भारताचं अभिनंदन! पंतप्रधान मोदींच्या 'सबका साथ, सबका प्रयास' या मंत्राने जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सातत्याने नवीन आयाम निर्माण करत आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात देशाने 75 कोटी लसीकरणाचा आकडा पार केला आहे.
Congratulations India!
PM @NarendraModi के सबका साथ, सबका प्रयास के मंत्र के साथ विश्व का सबसे बड़ा टीकाकरण अभियान निरंतर नए आयाम गढ़ रहा है। #AazadiKaAmritMahotsav यानि आज़ादी के 75वें वर्ष में देश ने 75 करोड़ टीकाकरण के आँकड़े को पार कर लिया है।#SabkoVaccineMuftVaccine pic.twitter.com/BEDmQZQsY7
— Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) September 13, 2021
आतापर्यंत झालेलं एकूण लसीकरण - 75,02,84,569
पहिला डोस - 57,00,46,655
दूसरा डोस - 18,02,37,914
आज झालेलं लसीकरण - 69,15,765
हिमाचल प्रदेश : 100% लसीकरणाचे उद्दिष्ट गाठणारं हे देशातील पहिलं राज्य आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सुमारे 50.57 लाख लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी गेल्या आठवड्यात सांगितलं होते की नोव्हेंबर 2021 पर्यंत लोकांचं पूर्णपणे लसीकरण (दोन्ही डोस) केलं जाईल .
गोवा : गोव्यात 11.18 लाख लोकांना कोरोनाची लस मिळाली आहे. त्यांनी किमान एक डोस घेतला आहे. मात्र, विरोधकांनी सरकारच्या आकडेवारीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव : या केंद्रशासित प्रदेशात 6,26,000 लोकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे.
सिक्किम : या ईशान्य राज्यातील 5,10,000 लोकांना लसीकरण करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे, लडाखमध्ये 1.97 लाख डोस आणि लक्षद्वीपमध्ये 53,499 कोरोना डोस देण्यात आले आहेत.