P Chidambaram On 2000 Note : भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी चलनातून 2000 रुपयांची नोट सक्रीय चलनातून हटवण्याची घोषणा केली आणि पुन्हा नोटबंदीची चर्चा सुरु झाली. पुन्हा एकदा देशात 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री 8.30 वाजता अचानक नोटबंदीची घोषणा केली होती. तशी नोटबंदीची चर्चा सुरु झालेय. आता पुन्हा एकदा 1000 रुपयांची नोट परत येणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, काँग्रेसने टीका करताना म्हटलेय, 2000 च्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे 2016 च्या नोटाबंदीचा निर्णय पूर्ण झाला आहे. चिदंबरम यांनी ट्विटरवरुन टीकेची झोड उठवलेय.
देशात लागू करण्यात आलेली नोटबंदी पूर्णत: फसलेली आहे. चलनातून 2,000 रुपयांच्या नोट चलनातून काढून घेण्याची घोषणा केल्याने विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून तीव्र टीका करण्यात येत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओ चिदंबरम यांनी या निर्णयाला अपेक्षित होते, असे म्हटले आहे. नोटाबंदीचा मूर्ख निर्णय लपवण्यासाठी सरकारने 2,000 रुपयांची नोट आणली होती. या निर्णयावर माजी अर्थमंत्री चिदंबरम यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, नोटाबंदीचे एक पूर्ण वर्तुळ झाले आहे.
चिदंबरम म्हणाले, 'काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ही नोटबंदी असल्याचे सांगितले गेले. मात्र, त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. नोटबंदीच्या काही आठवड्यांनंतर RBI वर दबाव आणून 500 रुपयांची नोट परत आणण्यात आली. आता RBI ने 1000 रुपयांची नोटही परत आणली तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. मला एकच आशा आहे की आरबीआय दोन हजार रुपयांची नोट मागे घेईल. त्यांनी असा दावा केला की 2,000 रुपयांची नोट बदलण्याचे (व्यवहार) फारसे लोकप्रिय माध्यम नाही. आम्ही हे नोव्हेंबर 2016 ला सांगितले होते आणि आम्ही योग्य असल्याचे सिद्ध केले आहे, असे ट्विट पी. चिदंबरम यांनी केले आहे.
As expected, the government/RBI have withdrawn the Rs 2000 note and given time until September 30 to exchange the notes
The Rs 2000 note is hardly a popular medium of exchange. We said this in November 2016 and we have been proved correct
The Rs 2000 note was a band-aid to…
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) May 19, 2023
आरबीआयने शुक्रवारी संध्याकाळी जारी केलेल्या निवेदनात, म्हटले आहे की सध्या चलनात असलेल्या 2,000 रुपयांच्या नोटा कायदेशीर असतील. आरबीआयने बँकांना 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा जमा करण्याची आणि बदलण्याची सुविधा देण्यास सांगितले आहे. 2000 रुपयांच्या नोटा 23 मेपासून बँकांमध्ये बदलता येणार आहेत. मात्र, एकावेळी फक्त 20,000 रुपयांच्या नोटा बदलल्या जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
30 सप्टेंबरनंतर, सर्व 2,000 रुपयांच्या नोटा बाद ठरणार आहेत. त्यामुळे कोणत्याही व्यावसायिक कारणासाठी वापरता येणार नाहीत. याचा अर्थ, यावर्षी 30 सप्टेंबरनंतर तुम्ही 2,000 रुपयांच्या चलनी नोटांचा वापर करून वस्तू खरेदी करू शकणार नाही किंवा बँकांमध्ये त्या जमा करु शकणार नाही. तथापि, तुम्ही वस्तू खरेदी करण्यासाठी रु. 2,000 च्या नोटा वापरू शकता किंवा त्या 30 सप्टेंबर 2023 पूर्वी बँकांमध्ये जमा करु शकता.