फ्लाइटच्या जेवणात आढळले झुरळ; एअरलाइन कंपनी म्हणाली, "आमचे संपूर्ण अन्न..."

उपम्यामध्ये सापडलं झुरळ

Updated: Oct 15, 2022, 05:31 PM IST
फ्लाइटच्या जेवणात आढळले झुरळ; एअरलाइन कंपनी म्हणाली, "आमचे संपूर्ण अन्न..." title=

तुम्ही फ्लाइटमध्ये असता आणि तुम्हाला दिल्या जाणाऱ्या जेवणात झुरळ आढळल्यास तुम्ही काय कराल? असाच काहीसा प्रकार एअर विस्ताराच्या फ्लाइटमधून (vistara flight) प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीसोबत घडलाय. निकुल सोलंकी नावाच्या या व्यक्तीला देण्यात आलेल्या जेवणात झुरळ (cockroach) असल्याचे समोर आलं आहे. जेव्हा सोलंकी यांनी या खाद्यपदार्थाचा फोटो ट्विट केला तेव्हा 10 मिनिटांत एअर विस्ताराचने उत्तर दिलं आहे. (Cockroach Found in Meal)

निकुलने ट्विट केलेल्या फोटोमध्ये इडली सांबर आणि उपमा आहे आणि दुसऱ्या फोटोमध्ये मेलेले झुरळ आहे. एअर विस्ताराच्या जेवणात एक लहान झुरळ आहे, असे नकुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. यानंतर एअर विस्ताराच्या अधिकृत हँडलवरून उत्तर देण्यात आले. "नमस्कार निकुल, आमचे संपूर्ण अन्न गुणवत्तेच्या सर्वोच्च मानकांनुसार तयार केले जाते. कृपया तुमचे फ्लाइट तपशील आम्हाला द्या. आम्ही या प्रकरणात लक्ष घालू आणि त्यानंतर शक्य तितक्या लवकर तुम्हाला प्रतिसाद देऊ," असे उत्तर एअर विस्ताराने दिलं आहे.

विशेष म्हणजे, गुरुवारी सिंगापूर एअरलाइन्स लिमिटेडने सांगितले की ते भारताच्या टाटा समूहासोबत गोपनीय चर्चा करत आहेत. त्यानुसार विस्तारा आणि एअर इंडियाचे एकत्रीकरण होऊ शकते. मात्र, यासंदर्भातील अटींची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.