Petrol-Diesel Price on 18 April 2023 : गेल्या पंधरवाड्यात तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे देशातील काही शहरात पेट्रोल-डिझेलच्या (petrol diesel rate) किंमती बदलल्या आहेत. तर काही राज्याच इंधन स्वस्त तर काही शहरात इंधनाचे दर वाढले आहे. तुम्ही पण जर गाडीत पेट्रोल-डिझेल (petrol diesel price) भरण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्यासाठी सुवर्णसंधी असेल. कारण आज तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान ब्रेंट क्रूडची किंमत $84 पर्यंत घसरली आहे. दरम्यान आज (18 एप्रिल 2023) सकाळी जाहीर झालेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्येही बदल दिसून येत असून आज अनेक शहरांमध्ये तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत.
आज कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय बदल झाला आहे. यामध्ये ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे $2 ने घसरून प्रति बॅरल $84.60 पर्यंत पोहोचली आहे. जागतिक बाजारात डब्ल्यूटीआयचा दरही घसरून प्रति बॅरल $80.72 झाला आहे. परिणामी गुरुग्राममध्ये पेट्रोल 24 पैसे प्रति लीटर 96.66 रुपये स्वस्त विकले जात आहे. तर डिझेल 22 पैसे स्वस्त होऊन 89.54 रुपये प्रति लिटर विकले जात आहे. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल 8 पैशांनी घसरले आणि 108.08 रुपयांवर पोहोचले. डिझेलही 7 पैशांनी घसरल्यानंतर 93.36 रुपये प्रतिलिटरने विकले जात आहे.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.
तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.