खूशखबर! पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग ११व्या दिवशी घट

...

Updated: Jun 9, 2018, 11:25 AM IST
खूशखबर! पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग ११व्या दिवशी घट title=
File Photo

नवी दिल्ली : सर्वसामान्य नागरिकांना एक दिलासा देणारी बातमी आहे. कारण, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा घट झाली आहे. सलग ११व्या दिवशी इंधन दरात घट झाली आहे. पाहूयात काय आहेत पेट्रोल-डिझेलचे आजचे दर...

शनिवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा एकदा घट झाल्याचं पहायला मिळालं. पेट्रोलच्या दरात ४० पैशांनी घट झाली आहे तर, डिझेलच्या दरात ३० पैशांनी घट झाली आहे. 

सर्वात महाग पेट्रोल मुंबईत

देशातील चार महानगरांचा विचार केला तर सर्वात महाग पेट्रोल मुंबईत मिळत आहे. मुंबईत पेट्रोलचा दर अद्यापही ८४ रुपयांच्या वर आहे.

सर्वात स्वस्त डिझेल दिल्लीत 

डिझेलच्या दरात ३० पैशांनी घट झाली आहे. चार महानगरांपैकी सर्वात स्वस्त डिझेल दिल्लीत मिळत आहे. शनिवारी दिल्लीत डिझेलचा दर ६८ रुपयांवर आहे.

३० मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग घट होत आहे. त्यापूर्वी कर्नाटक निवडणुकीनंतर १६ दिवसांत पेट्रोलच्या दरात ३.८० रुपये आणि डिझेल ३.३८ रुपयांनी वाढ झाली होती. गेल्या १० दिवसांची आकडेवारी पाहता दिल्लीत पेट्रोल १ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ७३ पैसे प्रति लिटर स्वस्त झालं आहे. मात्र, ज्या वेगाने पेट्रोल-डिझेल महागलं त्याच्या तुलनेत घट होताना दिसत नाहीये.