UP ELECTION 2022 : 10 रुपयांत थाळी, 300 युनिट मोफत वीज; जाणून घ्या काय आहे सपाच्या जाहीरनाम्यात

यूपी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याआधी समाजवादी पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना जनतेसाठी अनेक मोठी आश्वासने दिली.

Updated: Feb 8, 2022, 05:25 PM IST
UP ELECTION 2022 : 10 रुपयांत थाळी, 300 युनिट मोफत वीज; जाणून घ्या काय आहे सपाच्या जाहीरनाम्यात title=

लखनौ : यूपी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याआधी समाजवादी पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी लखनौमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध करताना अनेक मोठी आश्वासने दिली.

'आम्ही सत्य वचन घेऊन लोकांमध्ये जात आहोत. सपाने जी काही आश्वासने दिली आहेत, ती सरकार स्थापन झाल्यावर पूर्ण झाली आहेत. मी आज उत्तर प्रदेशातील शेतकरी आणि जनतेसमोर वचनपत्र ठेवत आहे, असे हा जाहीरनामा प्रसिद्ध करताना अखिलेश यादव म्हणाले, 
 
'शेतकऱ्यांना 15 दिवसांत पैसे'
राज्यातील 'सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचा एमएसपी निश्चित केला जाईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १५ दिवसांत पैसे दिले जातील. 4 वर्षात सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार आहे. शेतकऱ्यांना 2 पोती डीएपी, 5 पोती, सिंचनाची वीज मोफत दिली जाईल. तसेच, गेल्या वर्षी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ शेतकरी स्मारक बांधण्यात येईल असे जाहीरनाम्यात म्हटले आहे. 

या आहेत घोषणा 
- बीपीएल कुटुंबांना दरवर्षी 2 सिलिंडर मोफत
- मुलींचे केजी ते पीजीपर्यंतचे शिक्षण मोफत
- कन्या विद्या धन दिले जाईल
- इंटरमिजिएट उत्तीर्ण झाल्यावर मुलींना एकरकमी 36,000 रुपये
- गरजूंना 10 रुपयांत समाजवादी थाळी
- किराणा दुकानापेक्षा कमी दरात रेशन
- 'सर्व गावे आणि शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार'