मोदींनी उल्लेख केलेले कोण आहेत ते पंतप्रधान ज्यांना बसला १३ हजारांचा दंड

नियमांचं पालन न केल्याने बसला होता १३ हजारांचा दंड

Updated: Jun 30, 2020, 06:28 PM IST
मोदींनी उल्लेख केलेले कोण आहेत ते पंतप्रधान ज्यांना बसला १३ हजारांचा दंड title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित केले आणि देशवासियांना अनलॉक 2 बद्दल सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. तसेच कोरोनाचा आणखी संसर्ग टाळण्यासाठी शासन आणि स्थानिक प्रशासनाने खबरदारी घेण्याचा ही सल्ला दिला. यावेळी पंतप्रधानांनी बुल्गारियाचे पंतप्रधान बोयको बोरिसेव यांचं ही उदाहरण दिलं.  ज्यांना कोरोनाच्या काळात नियमांचं पालन न केल्यामुळे 13 हजार रुपये दंड भरावा लागला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोना या जागतिक साथीच्या विरोधात लढा देताना आपण आता अनलॉक -२ मध्ये प्रवेश करत आहोत. तसेच थंडी, सर्दी, खोकला, ताप ज्या हंगामात येतो त्या हंगामातही प्रवेश करत आहोत. अशा परिस्थितीत, मी सर्वांना विनंती करतो की प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्या.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोनातील मृत्यूचे प्रमाण पाहिले तर बर्‍याच देशांच्या तुलनेत भारतातील स्थिती स्थिर आहे. वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे लाखो लोकांचे जीव वाचले. परंतु देशात अनलॉक १ सुरु झाल्यापासून वैयक्तिक आणि सामाजिक दुर्लक्ष वाढत आहे. पूर्वी आम्ही मास्क आणि सामाजिक अंतर, हात धुण्याबाबत सावध होतो, परंतु आज जेव्हा आपल्याला अधिक दक्षतेची आवश्यकता आहे, तेव्हा वाढत चालला बेजबाबदारपणा हे मोठे चिंतेचे कारण आहे.

Narendra Modi mention Bulgarin Prime minister Boiko Borissov ...

पंतप्रधान म्हणाले की, 'एका देशाच्या पंतप्रधानांना मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी गेल्यामुळे 13 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. भारतातही स्थानिक प्रशासनाने असेच काम केले पाहिजे. १३० कोटी देशवासियांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी ही मोहीम आहे. गावचा प्रमुख असो किंवा देशाचा पंतप्रधान. कोणीही नियमांपेक्षा वर नाही.'