'पंतप्रधान मोदींनी नोकऱ्या देण्याच आश्वासन कधीच दिल नाही'

 भाजपचे ज्येष्ठ नेते व देशाचे अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांचे वक्तव्य व्हायरल

Updated: Jan 16, 2018, 09:55 AM IST
'पंतप्रधान मोदींनी नोकऱ्या देण्याच आश्वासन कधीच दिल नाही' title=

नवी दिल्ली : प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख येणार हा चुनावी जुमला होता हा भाजपा अध्यक्ष अमित शहांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. आता भाजपचे ज्येष्ठ नेते व देशाचे अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला असेच वक्तव्य केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोकऱ्या देण्याच आश्वासन कधीच दिल नव्हत असे ते म्हणाले आहेत.

त्यामूळे पक्षाने दिलेल्या आश्वासनांना आपल्याच नेत्यांनी हरताळ फासण्याचे प्रकार दिवसेंदिवस उघडकीस येत आहेत. 

नोकरी देऊ म्हटल नाही 

नोकरी आणि रोजगार यातील फरक शुक्ला यांनी समजवण्याचा प्रयत्न केला. नोकरीचा अर्थ 'सरकारी नोकरी' असा होत नाही तर 'रोजगार' असाच होतो अशी व्याख्या त्यांनी यावेळी सांगितली.

एक कोटी लोकांना रोजगार देऊ असं पंतप्रधान आपल्या लोकसभेतील भाषणात म्हणायचे, त्यांनी कधीच नोकरी देऊ असं म्हटलं नाही, असा दावा शुक्ला यांनी केला. यामूळे नव्या वादाला तोंड फुटणार आहे.

मुद्रा योजनेतून १० कोटी रोजगार 

 मुद्रा योजनांमधून १० कोटीहून अधिक लोकांना कर्ज देऊन रोजगार दिल्याचे शुक्ला यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात सुरु असलेली ही योजना म्हणजे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे, असंही शुक्ला म्हणाले.