Crime News: ...म्हणून जळती चिता विझवून मृतदेह बाहेर काढला; असं झालं तरी काय?

Crime News: या महिलेच्या माहेरचे नातेवाईक थेट पोलिसांना घेवून घटनास्थळी दाखल झाले. यावेळी महिलेची चिता पेटली होती. पोलिसांनी पाणी टाकून  चिता विझवली आणि मृतदेह बाहेर काढला. अर्धवट जळालेला हा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.  

Updated: Mar 14, 2023, 11:56 PM IST
Crime News: ...म्हणून जळती चिता विझवून मृतदेह बाहेर काढला; असं झालं तरी काय? title=

Rajasthan Crime News: गुन्हेगार कितना भी शातीर हो अखीर वो पकडा ही जाता है... असा डॉयलॉग अनेकदा आपण सिनेमांमध्ये ऐकतो. असाच काहीसा प्रकार राजस्थानमध्ये घडला आहे. एका महिलेवर अत्यंत गुप्तपणे अत्यंविधी सुरु होते. पोलिसांनी थेट स्मशानभूमी गाठली  आणि जळती चिता विझवून मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेवून पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे (Crime News). 

राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका २३ वर्षीय नवविवाहित महिलेचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. यावेळी या महिलेचा पती देखील घरी नव्हता. तिच्या सासरच्या मंडळींनी कुणालाही न कळवता या महिलेवर अत्यंविधी सुरु केला. मृत महिलेच्या माहेरच्यांना याबाबत माहिती मिळाली.

या महिलेच्या माहेरचे नातेवाईक थेट पोलिसांना घेवून घटनास्थळी दाखल झाले. यावेळी महिलेची चिता पेटली होती. पोलिसांनी पाणी टाकून  चिता विझवली आणि मृतदेह बाहेर काढला. अर्धवट जळालेला हा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. 

मृत महिलेचे नाव सोनिया असे आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील रहिवासी असलेल्या सोनियाचा विवाह सर्मथुरा येथील सहनिपाडा येथील आकाश याच्याशी झाला होता. त्यांच्या लग्नाला फक्त एकच वर्ष झाले आहे. आकाश हा मजुरीचे काम करतो, त्यामुळे तो अनेकदा बाहेर राहतो. 

आकाश घरी नसतानाच त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. मृत सोनियाच्या भावानेच पोलिसांना याबाबत माहिती दिली. तसेच त्यानेच आकाशला सोनियाच्या मृत्यूबाबात सांगितले. सोनियाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवाल आल्यावरच स्पष्ट होईल. 

गुपचूप अत्यंविधी करणाऱ्या सासरच्या मंडळींनी सोनियाच्या मृत्यूचे कारण सांगितलेले नाही. मात्र, ते अत्यंत गुप्तपणे अत्यंविधी का करत होते? इतर नातेवाईंकाना सोनियाच्या मृत्यूबाबात का सांगण्यात आले नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिस सोनियाच्या सासरच्या नातेवाईकांची चौकशी करत आहेत.