मुंबई : श्रावण महिन्या सुरु होण्यापूर्वी येणाऱ्या गटारी अमावस्या सिलिब्रेट करण्याचा फीवर तळीरामांमध्ये शिगेला पोहचला आहे. दारु पिऊन वाहन चालवणार्यांवर गटारीच्या रात्री पोलिसांची करडी नजर राहणार आहे. शहरातील प्रमुख नाक्यांवर श्वासविश्लेषक यंत्राद्वारे पोलिसांची पथके तैनात करण्यात येणार आहेत. सर्वच शहरांमधील विविध नाक्यानाक्यांवर वाहतूक पोलिसांचे पथक फिरणार असून हे पथक श्वास विश्लेषक यंत्राद्वारे मद्यपी चालकांची तपासणी करणार आहेत. जवळपास १२०० पोलीस गटारी सेलिब्रेशन वर नजर ठेवून असणार आहेत.
याशिवाय, खासकरून येऊरच्या पायथ्याशी पोलिसांचे पथक उभे राहणार असून तिथे चालकांची व गाड्यांची तपासणी सुरु झालीय. येऊरला अनेक हॉटेल्स बंगले आहेत तर काही धाबे व पिकनिक स्पॉट आहेत त्यामुळे अनेक लोक गटारी सेलिब्रेट करण्यासाठी येऊरचीच वाट धरतात. त्यामुळे ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांची एक टीम येऊरच्या पायथ्याशी तैनात आहे. ही टीम येणाऱ्या प्रत्येक गाडीची तपासणी करत आहेत. या गाडीतून मद्य किव्हा कोणतेही नशेचे पदार्थ जाऊ नये म्ह्णून ही तपासणी असणार आहे.
तसेच ड्रिंक अँड ड्राईव्ह,छेडछाड, वाहन जोरात चालवून अपघात, मारामारी सारख्या गोष्टींवर अंकुश बसावा म्हणून हा बंदोबस्त आहे. याच परिसरात गस्त घालणारी ही टीम असणार आहे. सिविल वेशात महिलांसह पुरुष पोलिसांची टीम या येऊर परिसरात गलोगली फिरणार आहेत. त्यामुळे येऊर परिसरात तळीरामांवर करडी नजर पोलिसांची असणार आहे.