पोपट पिटेकर, झी मीडिया,मुंबई : शहरात राहूनच जास्त पैसा कमवता येतो असं नाही. तुम्ही खेड्यापाड्यातही राहून भरपूर पैसे कमावू शकता. फक्त तुम्हाला चांगले पर्याय निवडता आले पाहिजे. सध्या कुक्कुटपालन (Poultry Farming) हा व्यवसाय लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. त्यामुळे पोल्ट्रीचं संगोपन (Rearing of Poultry) करून तुम्ही देखील चांगला नफा कमवू शकता. आणि हे शेतकऱ्यांसाठी खूपच किफायतशीर ठरत आहे.
तुमच्या घराजवळ किंवा मागे कोणतीही रिकामी जमीन (Poultry farming in vacant lots) असल्यास, तुम्ही तिथे कोंबड्यांसाठी फ्लीट्स (Fleets for chickens) बनवू शकता. हा फ्लीट तयार करण्यासाठी जास्त पैसे लागणार नाहीत. घराभोवती मोकळी जागा असल्याने घरगुती मजूरही सहज उपलब्ध होतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यासाठी कोंबडीच्या जाती योग्य प्रकारे (Breeds of chickens properly) निवडण गरजेचं आहे.
कुक्कुटपालनातून चांगला नफा मिळवायचा असेल तर वनराजा, कारी उज्ज्वल, कडकनाथ, ग्रामप्रिया, स्वरनाथ, केरी श्यामा, निर्भिक, श्रीनिधी, आणि कारी अशा (Vanaraja, Kari Ujjwal, Kadkanath, Grampriya, Swarnath, Keri Shyama, Nirbhik, Srinidhi, and Kari) कोंबडी पाळू शकता. या कोंबड्यांच्या संगोपनावर राज्य आणि केंद्र सरकार (State and Central Governments on Poultry Rearing) विविध सबसिडीही देतात.
राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेंतर्गत (Under the National Livestock Mission Scheme), शेतकऱ्यांना कुक्कुटपालनासाठी 50 टक्क्यांपर्यंत अनुदान देखील दिलं जाते. याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही नॅशनल लाईव्ह स्टॉक पोर्टलला (National Live Stock Portal) देखील भेट देऊ शकता. याशिवाय नाबार्ड (nabarad)अंतर्गत कुक्कुटपालनासाठी शेतकऱ्यांना अनुदानही (Subsidy to farmers for poultry farming) दिलं जातं.
देशी कोंबडीच्या (Native chicken) बाजारात 30 ते 60 रुपये एका कोंबडीची किंमत आहे. एका वर्षात एक देशी कोंबडी 160 ते 180 अंडी घालते. याशिवाय, तुम्ही त्यांचे मांस बाजारात (meat market) विकून चांगला नफा मिळवू शकता. हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी अतिशय किफायतशीर ठरू शकतो.