मुंबई : विमानप्रवास आरामदायी आणि कमी वेळाचा असला तरीही विमानतळावरील आणि प्रवासाच्या इतर अनेक गोष्टी त्रासदायक ठरतात.
एअरपोर्टवरील डोकेदुखीची एक अजून गोष्ट म्हणजे हॅन्डबॅग चेकिंग.
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या नव्या नियमानुसार, आता गोवा, पुणे, नागपूर आणि तिरूचिरपल्ली येथील विमानतळावर प्रवाशांना हॅन्डबॅगची सिक्युरिटीचेक स्टॅम्प करणं बंधनकारक नाही.
२०१६ साली सेंट्रल इंड्स्ट्रिएल सिक्युरिटी फोर्सने CISF हॅन्डबॅगवर सिक्युरिटी स्टॅम्प लावणं बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या पायलट प्रोजेक्टमध्ये सहा विमानतळांचा समावेश करण्यात आला होता.
प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि कमी त्रासदायक व्हावा याकरिता आम्ही प्रयत्नशील असल्याची माहिती
CISF ने दिली आहे. त्यामधील हा एक प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे.
आत्तापर्यंत एकूण २३ एअरपोर्टवरील ही हॅन्डबॅग सिक्युरिटी स्टॅम्पची सक्ती कमी करण्यात आली आहे तसेच पुढील काही महिन्यात अजून २७ विमानतळांचा यामध्ये समावेश होऊ शकतो.