घटस्फोटाच्या (Divorced) आदेशाविरोधातील अपील फेटाळताना पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने (Punjab-Haryana Highcourt) जर व्यभिचाराच्या (Adultery) आधारावर घटस्फोटाचा आदेश दिला असेल तर पत्नीला (Wife) पोटगी (alimony) मिळण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट केलय. अपील फेटाळण्याबरोबरच उच्च न्यायालयाने घटस्फोटाचा अंबाला (ambala) कौटुंबिक न्यायालयाचा निर्णयही कायम ठेवला. एका महिलेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून अंबाला येथील कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले होते. यामध्ये घटस्फोटाशी (Divorced) संबंधित तिच्या पतीच्या याचिकेला परवानगी देण्यात आली होती. (Punjab Haryana High Court Adultery wife not entitled to alimony divorce order upheld)
याचिकेच्या (petition) सुनावणीदरम्यान पतीने सांगितले की, त्याची पत्नी आपल्याला त्रास देत असे आणि वारंवार शिवीगाळ करत असे. लग्नानंतरच लोकांसमोर ती अपमान करत होती. अंबाला कारागृहात तैनात असलेल्या उपअधीक्षकासोबत त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोपही पतीने केला. कारागृह अधिकाऱ्याला अनेकवेळा याचिकाकर्त्याच्या घरी जाताना मित्रांनी पाहिले होते. पतीने सांगितले की, त्याच्या तक्रारीवरून पोलीस महासंचालकांनी या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षकांकडे सोपवला होता. पोलिस उपअधीक्षकांनी आपल्या तपास अहवालात हे व्यभिचाराचे प्रकरण असल्याचे सांगितले होते. काही काळापासून पत्नी त्याला तू पुरुष नाही असेही म्हणू लागली होती. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं.
हायकोर्टाने सांगितले की, या प्रकरणी पोलिसांचा अहवाल पाहिला असून त्यात याचिकाकर्त्याच्या व्यभिचाराचा उल्लेख आहे. हे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध केलेले अपील फेटाळून लावले. त्यानंतर याचिकाकर्त्याच्या पत्नीने पोटगीची मागणी केली. न्यायालयाने सांगितले की, या प्रकरणात व्यभिचाराच्या कारणावरून घटस्फोटाचा आदेश देण्यात आला आहे आणि अशा प्रकरणात पत्नी पोटगीसाठी पात्र नाही.