नवी दिल्ली : सोशल मीडिया अकाऊंट सोडणार असल्याचे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वेळापुर्वी केले. यानंतर देशभरातून उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत पंतप्रधानांना टोला लगावला आहे. सोशल मीडिया नको, द्वेश सोडा अशी बोचरी टीका राहुल यांनी ट्वीट करत केली आहे.
Give up hatred, not social media accounts. pic.twitter.com/HDymHw2VrB
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 2, 2020
येत्या रविवारी फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि युट्यूब वरील अकाऊंट सोडण्याचा विचार करत असल्याचे ट्विट मोदींनी केले आहे. याबद्दल तुम्हाला अधिक माहिती देईन असेही आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया सोडण्याचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. जगभरात सोशल मीडियात सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या नेत्यांपैकी पंतप्रधान मोदी हे आहे.
मोदींचे ट्विटरवर ५३.३ दशलक्ष, इन्स्टाग्रामवर ३५.२ दशलक्ष आणि फेसबूकवर १४४ मिलियन फॉलोअर्स आहेत.
दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराला सोशल मीडियावरच्या अफवांनी खतपाणी घातलं, त्यामुळे मोदी या निर्णयापर्यंत येऊन पोहोचले नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.