मुंबई : राजस्थानच्या (Rajasthan)जोधपूर (Jodhpur) येथील कारागृहातून 16 कैदी फरार झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूरच्या फलोदी कारागृहातून (Phalodi jail) 16 कैदी फरार झाले. मीडिया रिपोर्टनुसार कैद्यांनी तुरुंगात तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि ते तेथून पळून गेले. (Rajasthan: 16 prisoners absconding from Phalodi jail in Jodhpur, put red chilli in guard's eyes)
हे सर्व कैदी अमली पदार्थांचे तस्करी करणारे असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे. त्यानी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पावडर फेकली. यादरम्यान या कैदींनी इतर काही सुरक्षा कर्मचाऱ्यांना मारहाण केली आणि सर्वजण तेथून पळून गेले.
जोधपूर पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. पळून गेलेल्या कैद्यांचा शोध सुरु केला गेल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी लवकरच सर्व फरार कैद्यांना पकडण्यात येईल, असा दावा केला आहे.
दरम्यान, तुरुंगात कैद्यांना मिरचीची पावडर कशी मिळाली. तसेच त्यांच्यापर्यंत ही पावडर कशी पोहोचली, याबाबत जोरदार चर्चा आहे. ही पावडर कोणी त्यांना पुरवली, यामागे कोणाचा हात आहे, याची चर्चा सुरु झाली आहे. तर दुसरीकडे तुरुंगातील सुरक्षाव्यवस्था कुचकामी असल्याचे या घटनेवरुन दिसून येत आहे.