Crime News : गेल्या काही दिवसांत प्रेमप्रकरणातून होणाऱ्या गुन्हेगारीच्या (Rajasthan Crime) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच राजस्थानच्या कोटामध्ये (Kota) एक नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण केल्याचा धक्कादायक प्रकार कोटामध्ये घडलाय. घटनेनंतर पत्नीने प्रियकरासह पळ काढला आहे. पोलिसांनी (Rajasthan Police) याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला. खळबळजनक बाब म्हणजे पत्नीचा प्रियकर हा नात्यामध्ये तिचा भाऊ लागत होता. पोलीस सध्या दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत.
कोटाच्या बॉम्बे योजना परिसरात पत्नीने पतीची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या प्रियकरासह पतीला हातोडीने मारून ठार केल्याचे तपासात उघड झाले आहे. गोविंद बेरवा असे मृत पतीचे नाव आहे तर लक्ष्मी आणि सुनील अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. गोविंदची हत्या केल्यानंतर दोघेही घटनास्थळावरुन फरार झाले आहे.पोलिसांनी दोन्ही आरोपींचा शोध सुरु केला आहे.
गोविंदच्या हत्येनंतर आरोपी लक्ष्मी आणि कथित प्रियकर सुनील घटनास्थळावरून पळून गेले आहेत. मृत गोविंद बेरवा हा बॉम्बे योजना सुभाष नगर परिसरातील रहिवासी होता. रात्री उशिरा गोविंद आणि सुनील यांनी एकत्र दारू प्यायली. यादरम्यान त्यांच्यात जोरदार भांडण झाले. प्रकरण इतके वाढले की, लक्ष्मीने तिचा प्रियकर सुनीलसोबत मिळून पती गोविंदची हातोड्याने हत्या केली. त्यानंतर स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत पुरावे गोळा केले आहेत.
त्यानंतर पोलिसांनी रक्ताने माखलेला गोविंदचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयाच्या शवागारात नेऊन ठेवला. सध्या अन्नतपुरा पोलिस स्टेशन या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिसांनी काय सांगितले?
"आम्हाला सकाळीच माहिती मिळाली की सुभाष नगर येथे एका व्यक्तीची त्याची पत्नी आणि प्रियकराने हत्या केली आहे. आरोपी महिलेचा प्रियकर हा तिचाच लांबचा भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. घरात पोहोचताच त्या व्यक्तीचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. पोलीस आरोपींच्या शोधात आहेत. लक्ष्मी, सुनील आणि गोविंद रात्री तिघेही एकत्र होते. त्याचवेळी त्यांच्यात जोरदार भांडण झाले. भांडणानंतर दोघांनी मिळून गोविंदची हत्या केली. गोविंद हा गवंडी काम करत होता आणि त्याची हातोड्याने हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.