रामराजे शिंदे, झी मीडिया, दिल्ली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना काँग्रेस-राष्ट्रवादीनं बैठकीला बोलवलं नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. तर उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसंदर्भात सवडीचं राजकारण करत असल्याचा टोलाही लगावला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेला चर्चेला बोलविले नाही. आम्हाला कोणी साधी विचारणाही केली नाही. मी शेतकरी नेता आहे, याचा त्यांना अजून शोध लागलेला दिसत नसल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
शेतकऱ्यांना भेटणं हे उद्धव ठाकरेंचे सवडीचं राजकारण असल्याचे सांगत त्यांनी शिवसेनेलाही चिमटा काढला. शिवसेना शेतकऱ्यांसाठी आंदोलनं सवडीनंच करते. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरच आज राष्ट्रपतींची वेळ मागितली आहे. राज्यपालांनी ऐकले नाही आता राष्ट्रपतींना पाझर फुटतो का ?, ते पहायचे असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.