नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्हातून माणुसकीला काळीमा लावणारी एक धक्ककादायक घटना समोर आली आहे. एका विद्यार्थीनीचा बलात्कार करून तिला जिवंत जाळण्यात आले आहे. पिडीतेला तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले मात्र तिचा उरचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. बलात्कार आणि खूण केल्यानंतर आरोपीने पलायन केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसारउत्तर प्रदेशातील दिलदार नगर क्षेत्रात ही घटनी घडली आहे. एसपी अरविन्द कुमार चतुर्वेदी रविवारी म्हणाले, 'शुक्रवारी रात्री पिडीत मुलगी घरात झोपलेली असताना बाजुला राहत असणाऱ्या मेंहदी खानने बलात्कार करून तिच्यावर तेल ओतले आणि त्याने पलायन केले. शेजाऱ्यांना पिडीतेच्या ओरडण्याचा आवाज आल्यानंतर तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले.'