RBI To Issue Rs 50 Rs New Notes: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 50 रुपयांच्या नोटेसंदर्भात महत्त्वाची माहिती जारी केली आहे. देशाच्या केंद्रीय बँकेकडून लवकरच 50 रुपयांची नवी नोट जारी केली जाणार आहे. या नोटेवर आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असणार आहे.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चे नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असलेले 50 रुपयांची नोट लवकरच जारी केली जाणार आहे. शक्तीकांत दास यांच्या निवृत्तीनंतर मल्होत्रा यांनी डिसेंबर 2024 मध्ये पदभार सांभाळला होता. केंद्रीय बँकेने बुधवारी जारी केलेल्या अध्यादेशानुसार, या नोटांची डिझाइन महात्मा गांधी सीरीजच्या 50 रुपयांच्या बँकेच्या नोटांसारखेच असणार आहे. तसंच, या पूर्वी चलनात असलेल्या 50 रुपयांच्या नोटादेखील वैध असणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महात्मा गांधी (नवीन) सीरीजमधील 50 रुपयांच्या नोटेचा आकार 66 मिमी X 135 मिमी असून याचा रंग फ्लोरोसेंट निळा आहे. नोटेच्या मागे रथासोबत हंपीचे चित्र आहे. जे देशाचा सांस्कृतिक वारसा दर्शवतात.
2022मध्ये संजय मल्होत्रा यांना केंद्र सरकारने आरबीआय गर्व्हनर म्हणून नामांकित केलं होतं. ते आत्तापर्यंत डिपार्टमेंट ऑफ फायनेंशियल सर्व्हिसेज (DFS) चे सचिव म्हणून ते सेवेत होते. संजय मल्होत्रा 1990 बॅचचे राजस्थान कॅडरचे वरिष्ठ अधिकारी होते. नोव्हेंबर 2020 मध्ये ते आरईसीचे चेअरमॅन आणि एमडी म्हणून काम पाहत होते. काही कालावधीपर्यंत त्यांनी उर्जा मंत्रालयात अतिरिक्त सेक्रेटरी म्हणूनही काम पाहिले होते.