Government Job In Railway: रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC), पश्चिम रेल्वे (WR) त्याच्या अधिकृत वेबसाइटवर विविध क्रीडा कोट्याच्या पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करणार आहे. कुस्ती, पॉवरलिफ्टिंग, नेमबाजी, कबड्डी, जिम्नॅस्टिक्स, क्रिकेट, बॉल बॅडमिंटन आणि हॉकीसाठी रिक्त जागा उपलब्ध आहेत. कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार रेल्वे भरती 2022 साठी अर्ज करण्यास पात्र आहेत. उमेदवारांकडे क्रीडा क्षेत्रातील कामगिरीची नोंद असणं आवश्यक आहे. या पदांच्या भरतीसाठी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे, तर कमाल वयोमर्यादा 25 वर्षे असावी. अर्ज करण्याची प्रक्रिया 05 सप्टेंबर 2022 रोजी सक्रिय होईल. आवश्यक पात्रता निकष असलेले उमेदवार 04 ऑक्टोबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
रेल्वे भरती 2022 साठी अर्ज कसा करावा
उमेदवार RRC - WR वेबसाइट - https://www.rrcwr.com च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. नोंदणीच्या वेळी उमेदवारांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. उमेदवारांना 12 अंकी आधार क्रमांक भरावा लागेल. ज्या उमेदवारांकडे आधार क्रमांक नाही, पण आधारसाठी नावनोंदणी केली आहे. अशा उमेदवारांनी आधार नोंदणी स्लिपवर दिलेला आधार नोंदणी क्रमांक प्रविष्ट करू शकतात.
SC/ST/माजी सैनिक/महिला, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील उमेदवारांना 250 रुपये अर्ज शुल्क भरावे लागते. तर इतर श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
रेल्वेमधील भरती ही क्रीडा कामगिरी, चाचणी आणि शैक्षणिक पात्रतेचे मूल्यमापन यावर आधारित असेल. चाचणीमध्ये योग्य ठरलेल्या उमेदवारांचाच पुढील फेरीसाठी विचार केला जाईल. पात्र उमेदवारांना चाचणीपूर्वी कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. अधिसूचना तपासण्यासाठी थेट लिंक https://www.rrc-wr.com/rrwc/Files/195.pdf आहे.