High Inflation Rate : सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब, अन्नधान्याच्या किंमती वाढल्या

Inflation Rate : गेल्या दोन वर्षांपासून देशात कोविड महामारीमुळे (Covid19) आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आणि आता सर्वसामान्यांसाठी चिंतेची बातमी समोर येतेय. ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित किरकोळ महागाईची आकडेवारी सोमवारी जाहीर करण्यात आली.  

Updated: Sep 13, 2022, 10:37 AM IST
High Inflation Rate : सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब, अन्नधान्याच्या किंमती वाढल्या  title=

High Inflation Rate : देशातील महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना पुन्हा एकदा झटका बसला आहे. जुलै महिन्यात किरकोळ महागाईत (Inflation rate) थोडासा दिलासा होता. मात्र आता ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जुलैच्या तुलनेत किरकोळ महागाई दर पुन्हा ७ टक्क्यांवर पोहोचला आहे. 

तीन महिन्यांच्या घसरणीनंतर ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई (retail inflation) 7 टक्क्यांवर पोहोचली आहे. जुलैमध्ये किरकोळ महागाईचा (Inflation rate) दर 6.7 टक्के होता. तर एक वर्षापूर्वी म्हणजे ऑगस्ट 2021 मध्ये महागाई 5.30 टक्के होती. ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित किरकोळ महागाईची आकडेवारी सोमवारी जाहीर करण्यात आली.  

जुलै महिन्यात किरकोळ महागाईत घट होऊन ती 6.71 टक्क्यांवर आली होती. यापूर्वी जूनमध्ये किरकोळ महागाई 7.01 टक्के, मे महिन्यात 7.04 टक्के आणि एप्रिलमध्ये 7.79 टक्के होती. विशेष म्हणजे, देशातील महागाई सातत्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) निर्धारित केलेल्या लक्ष्य मर्यादेपेक्षा जास्त राहिली आहे.

अन्नधान्यात महागाई वाढली

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर ऑगस्टमध्ये 7.62 टक्के होता. जो जुलैमध्ये 6.69 टक्के होता. गेल्या वर्षी याच कालावधीत खाद्यपदार्थांची महागाई 3.11 टक्के होती. भाजीपाला, मसाले, पादत्राणे आणि इंधन-विद्युत क्षेत्रात सर्वाधिक महागाई दिसून आली आहे.

RBI च्या लक्ष्यापेक्षा सातत्याने वर

सरकारने सोमवारी किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर केली. याआधी जुलै महिन्यात किरकोळ महागाईत घट होऊन ती 6.71 टक्क्यांवर आली होती. यापूर्वी जूनमध्ये किरकोळ महागाई 7.01 टक्के, मे महिन्यात 7.04 टक्के आणि एप्रिलमध्ये 7.79 टक्के होती. विशेष म्हणजे, देशातील महागाई दर सलग आठव्या महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) निर्धारित केलेल्या लक्ष्य मर्यादेपेक्षा जास्त राहिला आहे. सरकारने महागाई दर 2 ते 6 टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, परंतु सर्व प्रयत्नांनंतरही महागाईचा दर याच्या वरच आहे.

या भागातील किमतींमध्ये वार्षिक आधारावर 10 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे. दुसरीकडे, अंड्यांची महागाई कमी झाली, तर मांस, मासे या खाद्यपदार्थांच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

वाचा : आता ट्रेनचं तिकीट नसलं तरी TC थांबवणार नाही! कसं ते जाणून घ्या

औद्योगिक उत्पादनात वाढ

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) सोमवारी जाहीर केलेल्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाची (IIP) आकडेवारीही प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार जुलै महिन्यात उत्पादनात 2.4 टक्के वाढ झाली आहे. एक वर्षापूर्वी, जुलै 2021 मध्ये, IIP मध्ये 11.5 टक्के वाढ नोंदवली गेली होती. आकडेवारीनुसार, जुलैमध्ये उत्पादन क्षेत्राचे उत्पादन 3.2 टक्क्यांनी वाढले, तर वीजनिर्मिती 2.3 टक्क्यांनी वाढली. त्याचवेळी खाण क्षेत्राच्या उत्पादनात 3.3 टक्के घट झाली आहे.