नवी दिल्ली : राजस्थानमध्ये बंडाचा झेंडा हातात घेत आपल्याच सरकारला अडचणीत आणणाऱ्या सचिन पायलट यांना काँग्रेसने मोठा दणका दिला आहे. काँग्रेसने सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवण्यात आले आहे. तसेच प्रदेशाध्यक्षपदावरुनही हटवण्यात आले आहे. आता ते काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुख्ममंत्री अशोक गेहलोत हे राज्यपाल यांच्या भेटीसाठी गेले आहेत.
Sachin Pilot removed as Deputy Chief Minister, announces Congress leader Randeep Singh Surjewala #Rajasthan pic.twitter.com/5tj3TJxZe8
— ANI (@ANI) July 14, 2020
सचिन पायलट यांना बंड हे महागात पडले आहे. सचिन पायलट यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांचे उपमुख्यमंत्रीपदही गेले आहे. उपमुख्यमंत्रीपदावरुन त्यांना दूर केल्याची माहिती काँग्रेसचे नेते रणदीप सिंह सूरजेवाला यांनी दिली आहे. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदासह प्रदेशाध्यक्षपदावरुनही हटवण्यात आले आहे. पायलट यांच्यासह त्यांच्या गोटात असणाऱ्या दोन मंत्र्यांनाही मंत्रिमंडळातून डच्चू देत काँग्रेसही अधिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हेच आता मुख्यमंत्री असणार हे स्पष्ट झाले आहे.
गेहलोत यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवावे, अशी मागणी सचिन पायलट यांनी केली होती. तसेच पक्षाने बोलविलेल्या आमदारांच्या बैठकीला दांडी मारली होती. त्यामुळे काँग्रेसने त्यांना कायमचा धडा शिकविण्याचा इशारा दिला. आज जयपूरच्या फेअरमाँट हॉटेलमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची दुसरी बैठक झाली. या बैठकीला सचिन पायलट अनुपस्थित होते. त्यांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे वारंवार आवाहन करण्यात आले होते. तरीही ते अनुपस्थित राहिले.
त्यानंतर आज विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर रणदीप सूरजेवाला यांनी पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याचा निर्णय जाहीर केला. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित असणाऱ्या १०२ आमदारांनी सचिन पायलट यांना पक्षातून काढण्याची मागणी केली. त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर कारावई केल्याचे एएनआयने या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या माहितीने दिले आहे.दरम्यान, सचिन पायलट यांनी आपल्यासोबत ३० आमदार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्यासोबत केवल १९ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आता विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी कोणासोबत कोण आहे, हेच स्पष्ट होणार आहे.