जयपूर: हिंदू आणि मुस्लिमांचे दोन वेगळे देश असावेत, असे सावरकरांना वाटत होते. मुस्लीम लीगच्या आधी त्यांनीच द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला होता, असे वक्तव्य काँग्रेस नेते शशी थरुर यांनी केले. ते जयूपर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, सावरकर, गोळवलकर आणि दिनदयाल उपाध्याय हे तिघे धर्माधारित राष्ट्रीयतेच्या पक्षात होते. मुस्लीम लीगने स्वतंत्र पाकिस्तानचा प्रस्ताव मांडण्याच्या तीन वर्ष आधीच सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला होता. त्यामुळे देशाच्या फाळणीसाठी सावरकर जबाबदार असल्याचे थरूर यांनी म्हटले.
द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताला महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी विरोध दर्शवला होता. धर्म ही तुमची ओळख असू शकत नाही. त्यामुळे यावरून कोणाचे राष्ट्रीयत्व निश्चित करता येणार नाही. आपण सर्वांनी स्वांतत्र्यासाठी संघर्ष केला आहे. सर्वांसाठी एकच देश तयार केला आहे, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे होते.
'माफी मागायला मी काही राहुल सावरकर नव्हे, राहुल गांधी आहे'
मात्र, सावरकरांच्या मते भारत ही केवळ हिंदुंची भूमी होती. यामध्ये हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन अशा समूहांचा समावेश होता. मात्र, मुस्लिम आणि ख्रिश्चनांचा या भूमीवर अधिकार नसल्याचे सावरकरांचे म्हणणे होते. त्यांची हिंदुत्वाची भूमिका संविधानाची पायमल्ली करणारी होती, असेही थरूर यांनी म्हटले.
सावरकरांच्या 'भारतरत्न' वरुन शिवसेनेचा भाजप-काँग्रेसवर निशाणा