PM Narendra Modi Security: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) सुरक्षेत मोठी त्रुटी असल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या कर्नाटक (Karnataka) दौऱ्यावर असून एक व्यक्ती सुरक्षाकवच तोडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळ पोहोचल्याने खळबळ माजली आहे. नरेंद्र मोदींची रॅली सुरु असताना सुरक्षेतील कमतरता जाणावली आहे. सुदैवाने पोलिसांनी वेळीत तरुणाला पकडलं. सुरक्षा यंत्रणांनी तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. दुसरीकडे त्याची संपूर्ण माहिती मिळवली जात आहे.
दावणगेरे येथील ही घटना आहे. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची रॅली आयोजित करण्यात आली होती. नरेंद्र मोदींची रॅली जात असताना त्यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेला मोठी गर्दी जमा झाली होती. नरेंद्र मोदींच्या नावे घोषणा दिल्या जात होत्या. याचवेळी एका तरुणाने उडी मारली आणि नरेंद्र मोदींच्या दिशेने धावत सुटला. तरुण मोदींच्या गाडीजवळ पोहोचणार इतक्यात तिथे उपस्थित पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्याला पकडलं आणि बाहेर आणलं. तरुण मोदींच्या इतक्या जवळ पोहोचल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
#WATCH | Karnataka: Security breach during PM Modi's roadshow in Davanagere, earlier today, when a man tried to run towards his convoy. He was later detained by police.
(Visuals confirmed by police) pic.twitter.com/nibVxzgekz
— ANI (@ANI) March 25, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी त्यांनी सभेला संबोधित केल्यानंतर रोड शोदेखील केला. पंतप्रधानांचा रोड शो असल्याने कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. रस्त्याचा दुतर्फा पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते. तसंच लोकांना बॅरिकेड्सवरुन उडी मारु नये अशी सूचना करण्यात आली होती. मात्र यानंतरही एका तरुणाने बॅरिकेडवरुन उडी मारत मोदींच्या दिशेने धावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना मात्र वेळीच या तरुणाला रोखलं आणि ताब्यात घेतलं. तरुण सध्या एसपीजीच्या ताब्यात आहे. या घटनेकडे फार गांभीर्यानं पाहिलं जात आहे.
जानेवारी महिन्यात नरेंद्र मोदींचा हुबळी येथे रोड शो झाला होता. यावेळी एक लहान मुलगा मोदींच्या जवळ पोहोचला असता. सहावीत शिकणाऱ्या या मुलाला मोदींना हार घालायचा होता. मोदी कारमधून बाहेर येऊन लोकांना अभिवादन करत असतानाच रस्त्याच्या कडेला उभा हा मुलगा सुरक्षा भेदत मोदींच्या अगदी जवळ पोहोचला होता. मोदींच्या सुरक्षेत तैनात असणाऱ्या एसपीजीच्या जवानांनी तात्काळ मुलाच्या हातातून हार काढून गेतला आणि त्याला परत पाठवलं.
सुरक्षेत इतकी मोठी त्रुटी झालेली असताना कर्नाटक पोलिसांनी मात्र ही चूक नव्हती असं सांगितलं होतं. मला मोदींना हार घालायचा होता. मला बातम्यांमधून मोदी येत असल्याचं समजलं होतं असं लहान मुलाने सांगितलं होतं.