Seema Haider: सीमा हैदर आणि सचिन यांची प्रेमकहाणी सध्या चर्चेत आहे. नोएडात राहणाऱ्या सचिनसोबत लग्न करण्यासाठी पाकिस्तानची सीमा हैदर अवैधरित्या भारतात आली. इतकंच नव्हे तर, सीमा तिच्या चार मुलांनाही घेऊन कायमची भारतात आली आहे. सचिनसोबत आयुष्य घालवण्यासाठी पाकिस्तान सोडले असल्याचा दावा सीमाने केला आहे. तर, सचिननेदेखील सीमाच्या चारही मुलांना स्वीकारले असून लग्न केल्याची कबुली दिली आहे. सीमा भारतात आल्याने अनेक तर्क वितर्कांना उधाण आले होते. त्यानंतर अलीकडेच सचिन-सीमाने त्यांच्याकडे कोणतेही काम नसल्याचे म्हटलं होतं. अखेर सीमा सचिनच्या मदतीसाठी एका निर्माते समोर आले आहेत. सीमा आणि सचिनला चित्रपटात काम करण्याची ऑफर देण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशच्या मेरठ येथील निर्माते अमित जानी यांनी सीमा हैदरला चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली आहे. अमित जानी यांनी म्हटलं सुरुवातीला आम्ही सीमा हैदरच्यासोबत नव्हतो मात्र जेव्हापासून त्यांना आर्थिक चणचण भासत असल्याचे माझ्या कानावर आले तेव्हा मदतीसाठी मी त्यांना मदतीचा हात दिला आहे. पाकिस्तानात गेलेल्या अंजूलाही तेथील रहिवाशी मदत करत आहेत. पण इथे तर पोलिसांचा तपास सुरू असल्यामुळं सचिन आणि सीमा काम करु शकत नाहीयेत.
सीमा आणि सचिनवर उपासमारीची तीव्र समस्या निर्माण झाली असल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. हीच बातमी अमित जानी यांनाही कळली. अमित जानी हे मेरठचे रहिवाशी असून ते उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. जानी यांनी सचिन आणि सीमा हैदर या दोघांना त्यांचे JANI FIREFOX या प्रोडक्शन हाऊसअंतर्गंत चित्रपटात काम कऱण्याची ऑफर दिली आहे. अलीकडेच अमित जानी यांनी मुंबईत फिल्म प्रोडक्शन हाऊस उभारले आहेत. तर, उदयपूरमध्ये कन्हैया लाल साहू यांच्यावरआधारित चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे नाव A Tailor Murder Story असं आहे. हा चित्रपट नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
अमित जानी यांनी सीमा आणि सचिनलाही चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली आहे. जर सीमा-सचिन त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करण्यास तयार झाले तर ते त्यांना लाखो रुपयांचा फी देऊ शकतात. त्यामुळं ते आरामात त्यांचे आयुष्य व्यतीत करु शकतात. अमित जानी अलीकडेच मुंबईत प्रोडक्शन हाऊस उभारले आहे. त्यामुळं सचिन सीमा मुंबईत येणार का? याकडे लक्ष लागून राहिले आहे.