पंजाब : पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसवाला ( Siddhu Muswala ) यांच्यावर काल मोठा हल्ला झाला. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आला होता. या पोस्टमॉर्टममधून धक्कादायक खुलासा बाहेर आला आहे.
हल्लेखोरांनी सिद्धू मूसवाला यांच्यावर 30 राऊंड गोळीबार केला होता. गोळ्या लागल्याने कारमध्ये बसलेले मुसेवालाचे दोन साथीदार जबर जखमी झाले. परंतु, सिद्धू यांचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतरच हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले.
सिद्धू मुसवाला यांच्या हत्येमागे गोल्डी बरार आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी सिद्धू मुसवाला यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविला.
सोमवारी रात्री पाच डॉक्टरांच्या पथकाने मुसेवाला यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले. या अहवालातून अत्याधुनिक बंदुकीतून सोडलेल्या २४ गोळ्या मुसेवाला यांच्या शरीरात घुसल्या. तर एक गोळी डोक्याच्या हाडात अडकल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा अहवाल अद्याप पोलिसांना देण्यात आलेला नाही.
ताज्या अपडेटनुसार, सिद्धू मुसेवाला यांच्यावर आज दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.