Sikkim Avalanche Update: सिक्कीममध्ये मंगळवारी मोठ्या प्रमाणात हिमस्खलन झालं. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या हिमस्खलनामुळे जवळजवळ 150 पर्यटक अडकून पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही दुर्घटना दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी घडली. या दुर्घटनेसंदर्भातील प्राथमिक माहिती समोर आली असून मदतकार्य सुरु करण्यात आलं आहे. मोठ्या संख्येनं पर्यटक उपस्थित असतानाच जवाहरलाल नेहरु मार्गावरील 14 मील या ठिकाणी हे हिमस्खलन झालं आहे. 70 ते 80 पर्यटक बर्फाखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अनेक पर्यटकांना बर्फाच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे. जेवढ्या लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे त्यापैकी 30 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. सोनम तेनजिंग भूटिया आयजी चेकपोस्टने दिलेल्या माहितीनुसार सर्व जखमींना एसटीएनएम आणि मणिपाल येथील रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं आहे.
#WATCH | Sikkim: Army, State Disaster Management Team and Police carry out search and rescue mission at Gangtok-Natu La road near Milestone 15 where an avalanche struck, claiming seven lives.
(Video: Indian Army) pic.twitter.com/7ZMDlH5SeP
— ANI (@ANI) April 4, 2023
सिक्कीम पोलिसांबरोबरच भारतीय लष्कर, पर्यटन विभागाचे अधिकारी, स्थानिक चालक या बचाव मोहिमेमध्ये सहभागी झाले आहेत. रस्ते सुरक्षा संघटनेनं (बीआरओने) दिलेल्या माहितीनुसार सिक्कीममधील हिमस्खलनानंतर गंगटोक आणि नाथुलाला जोडणाऱ्या जवाहरलाल नेहरु मार्ग 14 मीलवर बचावकार्य सुरु आहे.
#WATCH | Rescue operation underway at 14th mile on Jawaharlal Nehru road connecting Gangtok with Nathula after an avalanche strikes the area in Sikkim
22 tourists who were trapped in snow have been rescued. 350 stranded tourists and 80 vehicles were rescued after snow clearance… pic.twitter.com/kkV85NFWI5
— ANI (@ANI) April 4, 2023
आतापर्यंत बर्फाच्या ढिगाऱ्या खालून 22 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. रस्त्यावरुन बर्फ काढण्यात आल्यानंतर दुसऱ्या बाजूला अडकलेले 350 पर्यटक आणि 80 वाहनांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. पर्यटकांना 13 मीलपर्यंत जाण्याची परवानगी असते. मात्र पर्यटक पुढपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात.
#WATCH | Troops of Trishakti Corps, Indian Army undertake a rescue mission at Gangtok-Natu La road near Milestone 15 in Sikkim where an avalanche struck, claiming seven lives.
Seven others were administered first aid and returned to Gangtok. The road has been opened for traffic… pic.twitter.com/oCseR3HVKW
— ANI (@ANI) April 4, 2023
पर्यटकांना 15 मील परिसराचं विशेष आकर्षण असून येथे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या फारच जास्त आहे. 14 मील जवळ हिमस्खलन झाल्याने या 15 मील परिसरात अडकून पडलेल्या पर्यटकांची संख्या अधिक असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.