नवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीएम) सरचिटणीस पदावर सीताराम येच्युरी यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे. सीपीएमची एक बैठक हैदराबाद येथे पार पडली या बैठकीत ही निवड करण्यात आली. दरम्यान, ही निवड होण्याआगोदरपासूनच शक्यता वर्तविण्यात येत होती की, सीताराम येच्युरी यांच्यावर पुन्हा एकदा सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपविण्यात येईल.
दरम्यान, सीपीएमच्या सरचिटणीस निवडीवरून पक्षात दोन गट पडतील अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. गेल्या काही दिवसांपासून सीपीएममध्ये माजी सरचिटणीस प्रकाश करात आणि सीताराम येच्युरी यांच्या गटात संघर्ष असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे या वेळी प्रकाश करात यांच्या नावाचा आग्रह त्यांच्या गटाकडून धरला जाईल, तसेच, त्यांच्या नावावाच विचारही केला जाईल अशी शक्यता होती. मात्र, अखेर सीताराम येच्युरी यांनीच बाजी मारली.
दरम्यान, पक्ष सूत्रांनी या पूर्वी म्हटले होते की, पक्ष मध्यवर्ती समितीचे माजी महासरचिटणीस करात यांच्या बाजूने आहे. पण, येच्युरी यांच्या बाजूनेही जोरदार पाठिंबा व्यक्त झाला. येच्युरी हे पॉलिटिकल रेज्युलेशनवर आपला अल्पसंख्याक दृष्टीकोण व्याप्त आणि प्रभावीपणे व्यक्त करण्यातही यशस्वी ठरले.