Shocking Accident : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत अनेक बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. या घटनेत सॉफ्टवेअर इंजिनिअर (software engineer) तरूणीचा खड्डे चुकविताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 22 वर्षीय शोभना असे या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरूणीचे नाव आहे.तिच्या या मृत्यूने कुटूंबियांवर शोककळा पसरली आहे. तसचे या घटनेने शहरात संताप व्यक्त होतोय.
चेन्नईतील रस्त्यावर सॉफ्टवेअर इंजिनियर शोभना तिच्या भावासह स्कूटीने प्रवास करीत होती. या प्रवासा दरम्यान खड्डे चुकविताना ती रस्त्यावर पडली. आणि मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने तिला चिरड़ले. या अपघाताच तिचा जागीच मृत्यू झाला. तर यामध्ये तिचा भाऊ सुदैवाने वाचला होता. शोभनाच्या मृत्यूने कुटूबियांना मोठा धक्का बसला आहे.
शोभना तिच्या (Shobhana crushed by truck) भावाला NEETकोचिंग क्लासेससाठी एका संस्थेत सोडायला गेली होती. या दरम्यानच त्यांचा अपघात झाला. या अपघतात शोभनाचा जागीच मृत्यू झाला तर भावालाही गंभीर दुखापत झाली. मात्र तो जिवंत असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, शोभना (Shobhana crushed by truck) ही झोहो या खाजगी टेक कंपनीत अभियंता म्हणून काम करत होती. प्रवासा दरम्यान शोभना किंवा तिच्या भावाने हेल्मेट घातलेले नव्हते,अशी माहीती पोलिसांनी दिली आहे. तसेच अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेलेल्या ट्रक चालक मोहनला अटक करण्यात आली आहे.
शोभना (Shobhana crushed by truck) हिच्या मृत्यूसाठी खराब रस्त्यांना जबाबदार ठरवत झोहोचे सीईओ श्रीधर वेम्बू यांनी ट्विट केले आहे.या ट्विटमध्ये त्यांनी शोक व्यक्त केला आहे. आमची एक अभियंता शोभना चेन्नईतील मदुरावायलजवळ खड्डेमय रस्त्यांवर तिची स्कूटर घसरल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ती तिच्या लहान भावाला स्कूटीवरून घेऊन जात होती. शहरातील खराब रस्त्यांमुळे तिच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान शोभना (Shobhana crushed by truck) हिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. तसेच ट्रकचालक मोहनला बेजबाबदारपणे गाडी चालवल्याबद्दल आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल अटक करण्यात आली आहे," असे पूनमल्ली पोलिसांनी सांगितले आहे.