मुंबई : Stocks to Buy | रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम जगभरातील बाजारपेठांवर दिसून येत आहे. वाढती महागाई, अमेरिकेतील व्याजदरांमध्ये झालेली वाढ याचा परिणाम बाजारावर झाल्याचे दिसून आले. दरम्यान जगभरातील शेअर बाजारातही घसरण नोंदवली गेली. भारतीय शेअर बाजारालाही या घसरणीच्या झळा बसल्या. परंतू या घसरणीमध्ये अनेक स्टॉक्स गुंतवणूकीसाठी चांगल्या पातळीवर आले आहेत. असाच एक टेक्सटाईल क्षेत्रातील स्टॉक म्हणजेच ट्रायडंट (Trident)होय.
हा शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने ट्रायडंटमध्ये 1 वर्षाच्या मुदतीसह गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.
मोतीलाल ओसवाल या ब्रोकरेज फर्मने कापड क्षेत्रातील स्टॉक ट्रायडंटमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकमध्ये 1 वर्षासाठी गुंतवणूकीचा सल्ला देत 66 रुपये लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे.
18 एप्रिल 2022 रोजी ट्रायडंटच्या शेअरची किंमत 55 रुपये होती. गुंतवणूकदारांना सध्याच्या किमतीच्या सुमारे 20 टक्के परतावा मिळू शकतो.
ट्रायडंटच्या स्टॉकने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 302 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. म्हणजेच वर्षभरापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे आज 4 लाख रुपये झाले असते.
या कालावधीत शेअरची किंमत 13.45 रुपयांवरून (19 एप्रिल 2021) 55 रुपयांवर (18 एप्रिल 2022) गेली. ट्रायडंट ही टेक्सटाईल क्षेत्रातील कंपनी 1990 पासून स्थापन झाली.