जम्मू-काश्मीर : IED weighing 25 to 30 Kgs in Pulwama defused by police and security forces : पुलवामा जिल्ह्यात पुन्हा मोठा घातपाताचा कट उधळून लावला आहे. पुलवामा जिल्ह्यात IED हस्तगत करण्यात आले आहे. 30 किलो वजनाच्या स्फोटकांचा स्फोट घडवून सुरक्षा दलांवर हल्ला करण्याचा कट उधळलाय. पुलवामाजवळ तहाब क्रॉसिंगजवळ सर्क्युलर रोडवर ही स्फोटकं पकडण्यात आली. पकडलेली स्फोटकं नियंत्रित स्फोट घडवून नष्ट करण्यात आली. दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडेकोट सुरक्षा करण्यात आली असून सर्व वाहनांची तपासणी केली जात आहे.
जम्मू आणि काश्मीर येथे पुलवामा येथील सर्कुलर रोडवरील तहब क्रॉसिंगजवळ पोलीस आणि सुरक्षा दलांने 25 ते 30 किलो वजनाचा IED जप्त केली. ही जप्त केलेली स्फोटकं आता निकामी करण्यात आली आहेत. पुलवामा पोलिसांना ही गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस आणि सुरक्षा जवानांनी ही संयुक्तरित्या कारवाई केली.
सुमारे 25 ते 30 किलो IED जप्त करुन पोलिसांनी दहशतवाद्यांना मोठ हादरा दिला आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाला कटाचा मोठा डाव उधळण्यासाठी हे मोठे यश मिळाले आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक विजयकुमार यांनी दिली.
#WATCH | J&K: An IED weighing, approx 25 to 30 Kgs, that was recovered near Tahab Crossing on Circular road in Pulwama by Police and security forces today, has now been defused.
(Video Source: Indian Army) https://t.co/H4w9TBYWEl pic.twitter.com/OkECS073zg
— ANI (@ANI) August 10, 2022