नवी दिल्ली : खासगी लॅबमध्येही कोरोनाच्या टेस्ट फुकट करण्यात याव्यात, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. पण आता कोर्टाने हा निर्णय बदलला आहे. ज्या नागरिकांची पैसे द्यायची ऐपत आहे, त्यांच्याकडून खासगी लॅब जास्तीतजास्त ४,५०० रुपये घेऊ शकतात. पण जे नागरिक आयुषमान भारत योजनेअंतर्गत येतात, त्यांची टेस्ट फुकट होईल, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे.
खासगी लॅबमध्ये कोरोनाची फुकट चाचणी करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्यावर केंद्र सरकारने खासगी लॅबमध्ये कोरोनाच्या टेस्ट फुकट करायला नकार दिला. ही माहिती देणारं प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने कोर्टात दाखल केलं. यानंतर कोर्टाने खासगी लॅबमध्ये गरजूंचीच टेस्ट फुकट होईल, असा नवा आदेश दिला.
खासगी लॅबमध्ये गरिबांची कोरोना टेस्ट फुकट होणार आहे. या टेस्टचे पैसे केंद्र सरकार भरणार आहे. याचसोबत सर्वोच्च न्यायालयाने चांगल्या उपचारांसाठी सगळ्या खासगी रुग्णालयं राष्ट्रीयकृत करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे.