लालूंच्या मुलाचा ऐश्वर्या रायसोबत साखरपुडा

 राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा आणि माजी आरोग्य मंत्री तेजप्रताप यादवचा साखरपुडा झालाय. 

Updated: Apr 18, 2018, 10:34 PM IST
लालूंच्या मुलाचा ऐश्वर्या रायसोबत साखरपुडा title=

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा आणि माजी आरोग्य मंत्री तेजप्रताप यादवचा साखरपुडा झालाय. पाटण्यात एका खाजगी समारंभात हा साखरपुडा पार पडला. लालूप्रसाद यादव तुरुंगात आहेत. त्यामुळे ते या सोहळ्याला उपस्थित नव्हते. त्यामुळेच तेजप्रतापनं मिस यू पापा अशा असं ट्विटही केलं. ऐश्वर्या रॉय ही  बिहारमध्ये सक्रिय असलेल्या राजकीय कुटुंबामधली आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा प्रसाद राय यांची नात आणि  माजी मंत्री चंद्रिका प्रसाद यांची मुलगी आहे. 12 मे रोजी तेजप्रताप आणि ऐश्वर्याच्या लग्नाचा मुहूर्त काढण्यात आलाय. या लग्नासाठी राहुल गांधींसह विरोधी पक्षाच्या सगळ्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आलंय.

tej pratap and aishwarya engagement in patna

नितीश कुमार आणि मोदींना देणार आमंत्रण

विवाहासाठी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना आमंत्रित करणार का ? या प्रश्नावर उत्तर देतांना त्यांनी म्हटलं की, विवाहामध्ये राजकारण नसतं. नीतीश कुमार, मोदीजी आणि सगळ्यांना आमंत्रित केलं जाईल. 'सगळ्यांना माझा लग्नाची उत्सूकता होती. आता विवाह ठरला आहे. लग्नही नशिबाची गोष्ट असते. कोणाचा विवाह कोणाशी आणि कधी ठरेल हे कोणालाच माहित नसतं. आमच्या परिवाराची परंपरा आहे की, आई-वडीलच विवाह ठरवतात. त्यांची आवड हीच आमची आवड असते.

ऐश्वर्या रायसोबत विवाह

बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा प्रसाद राय यांची मुलगी आणि परसा विधानसभा क्षेत्रातील राजदच्या आमदार चंद्रिका राय यांची ही मुलगी आहे. तेजप्रताप आणि ऐश्वर्याचा साखपपुडा पटनातील मौर्या हॉटेलमध्ये १२ मेला होणार आहे. राजदचे आमदार आणि माजी मंत्री चंद्रिका राय यांनी देखील शुक्रवारी विवाहबद्दल माहिती दिली. ऐश्वर्या रायने आपलं शिक्षण पटनामधून केलं आहे. त्यानंतर दिल्लीमध्ये पुढचं शिक्षण पूर्ण केलं.

सुशील मोदींकडे केली होती मुलगी शोधण्याची मागणी

तेजप्रताप यांनी एकदा बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्याकडे मुलगी शोधण्याची मागणी केली होती. सुशील मोदी यांनी मुलगी शोधण्यापूर्वी ३ अटी ठेवल्या होत्या. पहिली गोष्ट हुंडा घेऊ नये, अवयव दान करणे आणि कोणाच्या ही लग्नात बाधा आणू नये. अशा ३ अटी त्यांनी ठेवल्या होत्या.

tej pratap and aishwarya engagement in patna

tej pratap and aishwarya engagement in patna