Prachi Rathod Ruth Transgender Doctors : तेलगंणामध्ये (Telangana) 2 ट्रांसजेंडर प्राची राठोड (Dr Prachi Rathore) आणि रूथ जॉन पॉल (Ruth John Paul) यांनी इतिहास रचत राज्यातील सरकारी सेवेत सामील होणारे पहिले ट्रांसजेंडर डॉक्टर (Transgender Doctors) बनले आहेत. हे दोन्ही डॉक्टर प्राची राठोड आणि रूथ जॉन पॉलने नुकतंच सरकारी उस्मानिया जनरल रूग्णालयात मेडिकल ऑफिसर (Medical Officer) म्हणून कार्यभार स्विकारला आहे. सामाजिक कलंक आणि भेदभाव याचा सामना नेहमी दोघींना करावा लागला असल्याचं, डॉक्टरांनी म्हटलंय. शिवाय या ठिकाणी पोहोचणं खूप कठीण होतं, असंही त्याचं म्हणणं आहे.
एका वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, उस्मानिया जनरल हॉस्पिटलचे अधिक्षक, डॉ, नागेंदर यांनी सांगितलं की, स्मानिया रूग्णालयातील एक ट्रांसजेंडर क्लिनिक सुरु करण्याचा प्रस्ताव होता. यासाठी 3 मेडिकल ऑफिसर यांची पदं रिकामी होती. या पदासाठी आम्ही ट्रांसजेंडर समुदाय आणि एचआयव्हीने प्रभावित वैद्यकीय व्यावसायिकला प्राधान्य देणार होतो. या पद्धतीने आम्ही 3 डॉक्टरांची भरती केली आहे. ज्यामुळे 2 ट्रान्सवुमन आहेत.
उस्मानिया जनरल हॉस्पिटलमध्ये पदभार सांभाळणाऱ्या डॉ. प्राची राडोठ यांनी सांगितलं की, मला फार छान वाटतंय. असं पहिल्यांदा घडलं असेल की, कोणी ट्रांसजेंडर कोणत्या सरकारी रूग्णालयात काम करणार आहे. एक डॉक्टरच्या रूपाने कोणत्याही लिंग भेदाशिवाय रूग्णाचा इलाज करणं याने मनाला वेगळं समाधान मिळतंय.
I feel great, this will be the first time a transgender will work for a government hospital. Feels great to treat patients without any gender difference, as their healthcare facilitator: Dr Prachi Rathod, Medical Officer, Osmania General Hospital (02.12) pic.twitter.com/K4cmmBWYfA
— ANI (@ANI) December 2, 2022
प्राचीने आदिलाबादच्या एका मेडिकल कॉलेजमधून 2015 मध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेतलं. डॉ. प्राची राडोठ यांचं म्हणणं आहे की, तुमच्या सर्व यशानंतरही हा कलंक तसंच यासंदर्भातील भेदभाव कधीही दूर होणार नाही.
दुसरीकडे डॉ. रूथ जॉन पॉल यांनी सांगितलं की, "मी माझ्या जेंडरमुळे लहानपणापासून खूप संघर्ष सहन केला आहे. डॉक्टर बनण्याच्या स्वप्नाने मला मेहनत करण्यासाठी प्रेरित केलं. मला समाज, मित्र आणि नातेवाईकांकडून अनेक गोष्टींचा सामना करावा लागला आहे. मी माझा डॉक्टरीचा अभ्यास पूर्ण केला आहे. यामध्ये मी माझे अधिक्षक आणि सर्व फॅकल्टीचे आभार मानते. त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकले."