नवी दिल्ली : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे.. केंद्र सरकारचं शिष्टमंडळ आज अण्णा हजारे यांची दिल्लीतल्या रामलीला मैदानावर जाऊन भेट घेणार आहेत. यावेळी हे शिष्टमंडळ अण्णा हजारेंना उपोषण सोडण्याचीही विनंती करणार आहेत.
राज्यातील मंत्री गिरीष महाजन केंद्र सरकारच्या या शिष्टमंडळात असतील. त्यामुळे आता या भेटीकडे राजकीय जाणकारांचं लक्ष लागलं आहे. गिरीश महाजन यांच्यासमवेत महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री देखील शिष्टमंडळात सामील असेल.
हे शिष्टमंडळ सरकारनं कृषीमालाच्या हमीभावासाठी घेतलेल्या निर्णयांचा तपशिल अण्णांसमोर सादर करेल...तसच यावेळी काही राज्यात उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याच्या निर्णयाची अंमलबजाणीसंदर्भातली माहितीही अण्णांना देण्यात येईल.