नवी दिल्ली: देशात मेक इन इंडीच्या माध्यमातून बनवण्यात आलेली भारतीय रेल्वेतील सर्वात जलद रेल्वे 'रेल्वे १८' म्हणजेच वंदे भारत एक्सप्रेसवर आज सकाळी चाचणी दरम्यान दगड फेकण्यात आला. 'रेल्वे १८'ला शकुरबस्ती येथील कार्यशाळेतून चाचणीसाठी नवी दिल्लीत आणले जात असताना दिल्लीच्या डेरा बस्तीयेथे रेल्वेवर दगडाने हल्ला करण्यात आला. याआधीही रेल्वेवर दगड फेकण्यात आला होता. मागील वर्षी २० डिसेंबर रोजी चाचणी दरम्यान एका अज्ञात इसमाने रेल्वेवर दगडाने हल्ला केला. त्यामुळे रेल्वेचे नुकसान झाले होते. हा हल्ला दिल्लीताल दया बस्तीयेथे झाला. घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने लोकांना रेल्वे संपत्तीला कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहचवू नये अशा सुचना दिल्या होत्या. मागे हल्ला झाला त्यावेळेस रेल्वे चाचणीसाठी आग्रा येथे जात होती.
प्रथम चाचणी यशस्वी
रेल्वे मंत्रालयानुसार, मेक इन इंडिया अंतर्गत तयार झालेल्या अत्याधुनिक 'ट्रेन 18'ची चाचणी मुरादाबाद आणि बरेली दरम्यान प्रति तास ११५ किलोमीटर वेगाने यशस्वी झाली.
दिल्ली-वाराणसी दरम्यान धावणार 'रेल्वे १८'
वंदे भारत एक्सप्रेस नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान ४ फेब्रुवारी रोजी चालवण्याची तयारी केली जात आहे. त्यासाठी २ फेब्रुवारीला रेल्वेची चाचणी घेण्यात येणार आहे. ८ तासांमध्ये दिल्ली-वाराणसी एवढे अंतर 'रेल्वे १८' कापणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसचे दर शताब्दी रेल्वेच्या दरापेक्षा ४५ टक्क्यांनी जास्त असणार आहे. सेमी बुलेट ट्रेन आणि वंदे भारत एक्सप्रेस भारतातील सर्वात जलद रेल्वे असणार आहेत. तर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ड्रीम प्रोजेक्ट असणार आहे.