नवी दिल्ली : सध्या पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे इलेक्ट्रिक वाहने खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. इलेक्ट्रिक स्कूटरच्या मार्केटला भारतात हळुहळु उभारी मिळू लागली आहे. भारतात विक्री होणाऱ्या टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सबाबतीत आम्ही आज सांगणार आहोत. सिंगल रिचार्जमध्ये 100 किमीहून जास्त मायलेज देणाऱ्या या स्कूटर आहेत.
OLA S1 इलेक्ट्रिक स्कूटर
या लिस्टमध्ये सर्वात आधी ओला स्कूटर ( S1 Electric Scooter )चा नंबर येतो. या स्कूटरची किंमत 1 लाख रुपये इतकी आहे. ही सिंगल चार्जिंगमध्ये 121 किमीपर्यंत धावू शकते. तसेच 90 किमी प्रति तासाच्या टॉप स्पिड गाठू शकते. या स्कूटरला चार्ज होण्यासाठी साधारण 5 तासाहून कमी वेळ लागतो. ओला स्कूटर S1 pro मॉडेलमध्येही येते. या मॉडेलची किंमत 1 लाख 30 हजार इतकी आहे.
Ampre Magnus Ex
नुकतेच Ampre इलेक्ट्रिकने Magnus Ex ई-स्कूटर लॉंच केली आहे. आपल्या अनेक फीचरसह मॅग्नस Exची एक्स पुणे शोरुम किंमत 68 हजार 999 रुपये आहे. ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 121 किमी पर्यत मायलेज देते.
Ather 450X
एथर एनर्जी भारतात सर्वात गतीने वाढणारी ईवी स्टार्टअपपैकी एक आहे. हा ब्रॅंड फक्त दक्षिणी भारतातील शहरांमध्ये जसे की, बंगळुरू आणि चैन्नईमध्ये आपल्या स्कूटरची विक्री करते. परंतु लवकरच हा ब्रॅंड दिल्ली आणि मुंबईतदेखील विक्रीसाठी येणार आहे. Ather 450X ही एक प्रमुख इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी आहे. या स्कूटरची किंमत 1 लाखापासून सुरू होते. तर मायलेज 107 किमी इतका आहे.
Bajaj Chetak
बजाज ऑटोची चेतक इलेक्ट्रिक स्कूटर शानदार लूक आणि स्टायलिश आहे. चेतक कंपनीची पहिलीच इलेक्ट्रिक स्कूटर आहे जी मागील वर्षी लॉंच करण्यात आली होती. ही स्कूटर दोन वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
TVS iQube
टीव्हीएस iQube स्कूटरला 2020 च्या सुरूवातीला लॉंच करण्यात आले होते. ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 78 किमी पर्यंत धावू शकते. तर 78 किमी प्रतितास इतका या स्कूटरचा स्पीड आहे. या स्कूटरची किंमत 1.15 लाख रुपये इतकी आहे.