नवी दिल्ली : भारतीय लष्कराला आता नवीन बंदूक मिळणार आहे. AK- 103 ही बंदूक यापुढच्या काळात लष्कराचं मुख्य हत्यार असणार आहे. या बंदुकीचं उत्पादन लवकरच भारतात सुरू केलं जाणार आहे. याबाबत लवकरच भारत आणि रशिया यांच्यातील संबंधित कंपन्यामध्ये करार होणार आहे. यानुसार पुढील काही वर्षांत लष्करात सुमारे 7 लाखांपेक्षा जास्त AK - 103 रायफल दाखल होणार आहेत. इन्सास, AK - 47, AK- 56 या बंदुकीची जागा यापुढे AK - 103 रायफल घेणार आहे. एका मिनिटांत 600 गोळ्या झाडण्याची AK-103 या बंदुकीची क्षमता आहे. ही बंदूक सुमारे 500 मीटरपर्यंत अत्यंत अचूक मारा करु शकते. सध्या नौदलाचे कमांडो या बंदुकीचा वापर करतात. AK - 103 ही AK - 47 ची अत्याधुनिक आवृत्ती आहे.
याआधी भारताने साधारण 700 कोटी रुपये किंमतीच्या 72,400 असॉल्ट रायफल खरेदीसाठी अमेरिकन कंपनीसोबत करार केला आहे. सुरक्षा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी याबद्दल माहिती दिली. अमेरिकेसहित अन्य युरोपीयन देशांनी वापरात आणलेल्या या रायफल फास्ट ट्रॅक सरकारी खरेदी प्रक्रिेये अंतर्गत खरेदी केल्या जात आहे.
भारताने फास्ट ट्रॅक प्रोक्योरमेंट (एफटीपी) अंर्गत एसआयजी जॉर असॉल्ट रायफल्स साठी अमेरिकेसोबत करारावर स्वाक्षऱ्या केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या कराराअंर्गत भारताला आजपासून एका वर्षाच्या आ अमेरिकन कंपनी एसआयजी जॉर कडून 72,400, 7.62 एमएम रायफल मिळतील. या रायफल साधारण 700 कोटी रुपयांच्या किंमतीत खरेदी केल्या जाऊ शकतील असेही त्यांनी सांगितले. या रायफली छोट्या. ठोस, आधुनिक टेक्निकच्या असल्याने युद्धजन्य परिस्थितीत कामास येणाऱ्या आहेत.
या महिन्याच्या सुरूवातीला एसआयजी जॉर रायफलच्या खरेदीसाठी मंजूरी मिळाली होती. याचा उपयोग भारत चीनच्या सीमेवर असलेल्या आपल्या सैनिकांना होणार आहे. साधारण 3,600 किलोमीटर सीमेवर हे सैनिक तैनात आहेत. ऑक्टोबर 2017 मध्ये सात लाख रायफल, 44 हजार लाइट मशिन गन (एसएमजी) आणि साधारण 44,600 कार्बाइनची खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.