कोलकाता : पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जे लोक आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करतील त्यांना तरुंगात जावे लागेल किंवा त्यांना गोळी मारली जाईल. आम्ही एका एका गोळीचा हिशोब ठेवत आहे. बंगालमधील सत्ताधारी पार्टी तृणमूल काँग्रेसला धमकी वजा इशारा देताना घोष म्हणाले की, भाजप पक्षाच्या नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना धमकी देण्यात आली, त्यांना नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला करत भाजपही प्रत्युत्तर देईल.
पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी येथील एका संभेमध्ये बोलताना दिलीप घोष यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भाजपने टीएमसी कार्यकर्त्यांसोबत शांततेचा करार केलेला नाही. आम्ही प्रत्येक गोळीचा हिशोब ठेऊन आहोत. आमच्या लोकांना मारणारे लोकं एक तर तुरुगामध्ये जातील किंवा गोळी खातील, असे दिलीप घोष टीएमसी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले, असे वृत्त एएनआयने दिलेय.
Those who are attacking our party supporters will get imprisoned or bullets. We are counting every bullet which killed our workers: #WestBengal BJP chief Dilip Ghosh in Jalpaiguri pic.twitter.com/5lJnauXJ6M
— ANI (@ANI) June 20, 2018
गेल्या काही महिन्यांमध्ये टीएमसी कार्यकर्त्यांकडून भाजप नेते आणि कार्यकर्त्यांवरील हल्ल्यांचे प्रमाण राज्यात वाढल्याचे दिसून आले आहे. त्याच अनुषंगाने घोष यांचे हे वक्तव्य केलेय. त्यामुळे येत्या काळात पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि टीएमसीमध्ये राड्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबाबतही वादग्रस्त विधान केलेय. ममता दिल्लीत नाटक करत आहेत. दिल्ली ही आमची आहे. दिल्लीत आमचे पोलीस आहेत. त्यांना जबरदस्तीने बाहेर काढू. तसेच टीपू सुल्तान मस्जिदचे इमाम यांनीही एक फतवा काढला. दिलीप घोष यांना राज्याच्या बाहेर हाकलून दिले पाहिजे. दिलीप घोषला दगडांनी मारले पाहिजे. दगड मारुन त्यांना बंगालमधून बाहेर काढले पाहिजे. या फतव्यानंतर दिलीप घोष यांनी हे पाकिस्तान नाही की, येथे फतवा चालेल.
वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहण्याचा घोष यांचा हातखंडा आहे. गेल्या वर्षी एका रॅलीमध्ये त्यांनी ‘गुजरात ते गुवाहाटी आणि कश्मीर ते कन्याकुमारीमधील जनतेला ‘भारत माता की जय’ म्हणावे लागेल. जे लोक असे करणार नाहीत ते इतिहास बनतील, असे वक्तव्य घोष यांनी केले होते. त्यापूर्वी २०१६ मध्ये पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या लोकांची सहा इंचांनी कमी (मुंडके उडवण्यात येईल) करण्यात येईल असे म्हटले होते.