चांदीमध्ये गुंतवणूक करणं आता आणखी सोप्पं! अगदी 500 रुपयांमध्ये करा डिजिटल गुंतवणूक

New Fund Offer : चांदीमध्ये डिजिटल पद्धतीने गुंतवणूक करण्यासाठी भारतातल्या प्रमुख म्यूचुअल फंड हाऊसेसपैकी एक एचडीएफसी असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने एक स्कीम लाँच केली आहे.

Updated: Aug 20, 2022, 08:46 AM IST
चांदीमध्ये गुंतवणूक करणं आता आणखी सोप्पं! अगदी 500 रुपयांमध्ये करा डिजिटल गुंतवणूक title=

New Fund Offer : चांदीमध्ये डिजिटल पद्धतीने गुंतवणूक करण्यासाठी एचडीएफसी (HDFC) म्यूचुअल फंडने एचडीएफसी सिल्वर ईटीएफ (HDFC Silver ETF) ही स्कीम लाँच केली आहे. ही एक ओपन एंडेड एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) स्कीम आहे, जी चांदीच्या परफॉर्मंसच्या रेप्लकिट/ ट्रेकिंग करते. ही NFO स्कीम 18 ऑगस्ट 2022 ला सब्सक्रिप्शसाठी खुली केली आहे आणि 26 ऑगस्ट 2022 पर्यंत सुरु असणार आहे.

पोर्टेबल डिवाईस, इंडस्ट्रिअल इक्लिपमेंट, इलेक्ट्रिल वाहन, मेबिलिटी, एनर्जी जेनरेशन आणि टेलीकॉम यांसारख्या इंडस्ट्रिअल हालचालींमध्ये होणारा वापर याचा विचार करता, हा फंड कंज्यूमर्सला चांदामध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देतो. या फंडमध्ये 0.999 शुद्धतेच्या सिल्वर बुलियनमध्ये गुंतवणूक केली जाते. भारतातल्या प्रमुख म्यूचुअल फंड हाऊसेसपैकी एक एचडीएफसी असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड आहे. तब्बल 4.15 लाख कोटी रुपयांचा या कंपनीचा एसेट अंडर मॅनेजमेंट (AMC) आहे.

500 रुपयांमध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते.

अगदी 500 रुपयांची देखील गुंतवणूक HDFC Silver ETF मध्ये केली जाऊ शकते. याचा बेंचमार्क चांदीचा स्थानिक भाव आहे. 'असे रिटर्न निर्माण करणे, जे स्थानिक बाजारपेठेत फिजिकल सिल्वर किंमतींप्रमाणे असतील', असा या गुंतवणूकीचा हेतू आहे. फिजिकल सिल्वरमध्ये गुंतवणूक करणं आणि त्याला सुरक्षित ठेवणं यात थोडी जोखीम असते. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदारांना डिजिटल स्वरुपात गुंतवणूक करण्याची आणि केलेल्या गुंतवणूकीच्या सुरक्षिततेची संधी HDFC Silver ETF देते. तसेच, बाजारातील चालू भावानुसर अगदी सहजतेने याचा ट्रेड करता येऊ शकतो. 

(Disclaimer : म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. येथे NFO माहिती दिलेली आहे. गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी कृपया तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्या.)