मालदा, पश्चिम बंगाल : महानंदा नदी पार करताना जवळपास ५० लोकांनी भरलेली होडी बुडाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला असून ३० जणांना वाचवण्यात यश आले आहे. एनडीआरएफच्या पथकाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. ही बोट बुडतानाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
एनडीआरएफची ७ पथके घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरु आहे. होडीमध्ये बसलेले लोक पश्चिम बंगालच्या मालदाहून बिहारमधील कटिहार येथे जात होते. यावेळी होडी पलटल्याने, होडीत बसलेले सर्व लोक नदीत पडले असल्याची माहिती मिळत आहे.
Video from Mahananda river near Bihar-Bengal border . As per reports, 60 people were on boats.
(Viral Vedio ) pic.twitter.com/wtgz8UgWFI
— snehanshu shekhar (@snehanshus) October 4, 2019
मालदाचे एसपी आलोक राजोरिया यांनी ३ जणांचा मृत्यू झाला असून आणखी ३० ते ४० जण बेपत्ता असल्याचे सांगितले आहे. तर प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या वेग-वेगळ्या विधानांवरुन होडीमध्ये बसलेल्या लोकांचा आकडा ३० ते ४० असल्याचे तर कधी ७० असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.