वयोवृद्ध मित्रांच्या मैत्रीकडे पाहून व्हाल भावुक; काही क्षणांचा आनंद देणारा सुंदर VIDEO पाहिला का?

Viral Old Friend Video: वयोमानाप्रमाणे सगळ्याच गोष्टी बदलतात परंतु मैत्री ही कधीच बदलत नाही. त्यातून वयोवृद्ध लोकांचीही एकमेकांमध्ये असलेली मैत्री हीसुद्धा फार अमूल्य असते. असाच एक व्हिडीओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

गायत्री हसबनीस | Updated: Nov 12, 2023, 02:06 PM IST
वयोवृद्ध मित्रांच्या मैत्रीकडे पाहून व्हाल भावुक; काही क्षणांचा आनंद देणारा सुंदर VIDEO पाहिला का? title=
two old friends emotional video while having tea and chat goes viral latest instagram trends

Viral Old Friend Video: सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे अशा व्हिडीओची जोरात चर्चा असते. परंतु या सगळ्यात सध्या तुम्हा आम्हाला आनंद देणारा असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वयोमानाप्रमाणे सगळ्याच गोष्टी बदलतात परंतु मैत्री ही कधीच बदलत नाही. त्यातून वयोवृद्ध लोकांचीही एकमेकांमध्ये असलेली मैत्री हीसुद्धा फार अमूल्य असते. असाच एक व्हिडीओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

दोन वयोवृद्ध मित्र मस्तपैंकी एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत असून ते मस्तपैंकी चहा पिताना दिसत आहेत. यावेळी त्यांचा आनंद पाहून नेटकऱ्यांनी नाना तऱ्हेच्या कमेंट्स केल्या आहेत. अशी मैत्री ही सध्या फारच दुर्मिळ पाहायला मिळते त्यामुळे सध्या हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होतो आहे. 

अनेकांनी आपल्या बेस्ट फ्रेंड्सना या व्हिडीओखाली टॅग केले आहे. सोबतच आपल्या मैत्रीविषयीही कमेंट्स सेक्शनमध्ये लिहिले आहे. @ek_premveda या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आपल्या आयुष्यात आपले अनेक मित्र असतात. त्यातून आपला असा एक मित्र असतोच जो खास असतो. त्याच्यासोबत आपण आयुष्यभर एकत्र असतो. या खास मित्रासोबत आपण अनेक गोष्टी शेअर करतो. आपली सुख-दु:ख शेअर करतो. त्यामुळे मैत्रीपेक्षा एक वेगळंच नात त्या व्यक्तीशी आपले झालेले असते. या नात्यात भांडणंही होतात सोबतच गैरसमजही होतात परंतु मैत्री ही कायमच टिकून राहते. अशी मैत्री कोणालाही तोडलं सहज शक्य होतं नाही. 

याच मैत्रीचा हा व्हिडीओ आपल्याला जिवंत उदाहरणं देतं. चित्रपटांमधूनही आपण पाहतो की दोन मित्रांची गोष्ट दाखवण्यात येते. मोठमोठ्या हॉलिवूडपटातूनही आपल्याला अशी अनेक उदाहरणं ही पाहायला मिळाली आहेत. सध्या या दोन वृद्ध मित्रांचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यातून एकत्र एका टपरीवर ते दोघं चहा पिताना बसले आहेत आणि त्यांच्यात मस्तपैंकी गप्पा रंगल्या आहेत. अनेक जण हा व्हिडीओ पाहून भावूकही झाले आहेत. 'एकच असावा आपण चुकीचे असो किंवा बरोबर तो सोबत असावा', असं कॅप्शन यावेळी याला देण्यात आलं आहे.