मुंबई : आता बातमी, कधीही न बनणाऱ्या 'रावणाच्या आधारकार्डा'ची...
दसऱ्याच्या मुहूर्तावर UIDAI नं ट्विट करत भारतीयांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या... रावणाचा एक प्रतिकात्मक फोटो ट्विट करण्यात आला. त्या माध्यमातून नागरिकांना प्रशासकीय कामकाज कसं गतिमान करता येईल, याची माहिती देण्यात आली.
A time when the world sees the power of good governance.
Let us continue this true spirit with Aadhaar...#HappyDussehra pic.twitter.com/5KE5uVo1Dc— Aadhaar (@UIDAI) September 30, 2017
या ट्विटला रिप्लाय करताना एका नागरिकानं एक अजब प्रश्न केला. रावणालाही आधार कार्ड मिळणार का? असा प्रश्न त्यानं विचारला. रावणाला दहा तोंडं असतात, मग त्याची दहा आधारकार्ड तयार होणार का? असंही विचारण्यात आलं.
या प्रश्नाला UIDAI नंही गंमतीशीर उत्तर दिलंय. 'रावण' हा भारतीय नागरिक नसल्यानं त्याला आधारकार्ड मिळू शकत नाही, असं UIDAI नं म्हटलंय. या ट्विटला हजारो लोकांनी रिट्विट केलंय.
Not a resident of India. Not eligible to enroll for Aadhaar.
— Aadhaar (@UIDAI) September 30, 2017