Heart Attack : डीजेच्या तालावर नाचता नाचता अचानक कोसळले, मृत्यूचा Live Video

घरात आनंदाचं वातावरण होतं, लग्न समारंभात सर्व कुटुंबिय डीजेच्या तालावर नाचत होते, पण अचानक... व्हिडिओ होतोय व्हायरल

Updated: Nov 29, 2022, 10:34 PM IST
Heart Attack : डीजेच्या तालावर नाचता नाचता अचानक कोसळले, मृत्यूचा Live Video title=

Heart Attack Video:लग्न कार्य असलं की घरात आनंदाचं वातावरण असतं. नातेवाईक-पाहुणे समारंभात सहभागी होतात, हा क्षण कायमचा लक्षात रहावा यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. विशेषत: नाचगाण्याच्या कार्यक्रमात प्रत्येकजण उत्साहाने सहभागी होतो. अनेकजणांना नाचण्याचा मोह आवरत नाही. 

लग्नसमारंभात पसरली शोककळा
पण अशा समारंभात एखादी वाईट घटना घडली की संपूर्ण वातावरणच बदलून जातं. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नाचता नाचता एका व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला. एका लग्नसमारंभातला हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत काळ्या ब्लेझरमध्ये एक व्यक्ती नाचताना दिसत आहे. त्याच्याबरोबर काही महिलाही नाचत आहेत.

वाराणसीची आहे घटना
ही संपूर्ण घटना उत्तर प्रदेशमधल्या वाराणसी इथली आहे. वाराणसीतल्या पिपलानी कटरा इथल्या औघडनाथ तकिया इथ राहणाऱ्या एका कुटुंबात लग्नकार्य होतं. या लग्नकार्यात मनोज कुमार विश्वकर्मा नावाची व्यक्ती सहभागी झाली होती. लग्नकार्यता नाचण्याचा कार्यक्रम सुरु होता. यात मनोज कुमारही नाचत होते.

हे ही वाचा : अभिनेत्री रवीना टंडनवर कारवाई होणार? दिले चौकशीचे आदेश

नाचता नाचता कोसळले
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत मनोज कुमार डीजेच्या तालावर नाचताना दिसत आहेत. यात काही महिलाही सहभागी झालेल्या दिसत आहेत. यावेळी अचानक मनोज कुमार कोसळताना दिसत आहेत. कोसळल्यानंतर मनोज कुमार यांचा जागीच मृत्यू झाला. तिथे उपस्थित असलेल्या लोकांना काय झालं हे समजण्याआधीच मनोज कुमार यांचा मृत्यू झाला होता.मनोज कुमार यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना हार्ट अटॅक आला आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee News (@zeenews)

40 व्या वर्षात निधन
मिळालेल्या माहितीनुसार मनोज कुमार विश्वकर्मा हे 40 वर्षांचे होते. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना कोणताही आजार नव्हता. तसंच ते नेहमी आनंद असायचे. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतआहे.