मुंबई : रेशन कार्डधारकांसाठी (Ration Card News) अतिशय महत्त्वाची बातमी आहे. रेशन कार्डबाबत आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार अंत्योदय कार्डधारकांचं (Antyodaya) लवकरच व्हेरिफिकेशन पार पडणार आहे. या व्हेरिफिकेशनमध्ये अपात्र आढळणाऱ्या रेशन कार्डधारकांचं रेशन कार्ड रद्द केलं जाईल. ज्यामुळे त्यांना रेशन मिळणार नाही. योगी सरकारने हा निर्णय घेतला आहे. पडताळणी करताना ज्यांचे रेशन कार्ड रद्द केलं जाईल, त्याच जागी नव्या अर्जदारांना रेशन कार्ड बनवून दिलं जाईल. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. (up yogi government tell about ration card verification know details)
अनेक अपात्र असलेले कार्डधारक रेशन घेतात. अशांबद्दल अनेक तक्रारी मिळतात. त्यामुळे नेशनल फूड सिक्युरिटी एक्ट 2013 नुसार अभियान चालवलं जात आहे. अपात्र कार्डधारकांच्या जागी पात्र असलेल्यांना कार्ड दिलं जातं. अपात्रंना डावळून पात्र असेल्यांना लाभ मिळावा, असं या अभियानाचं उद्देश आहे.
सूचनेनुसार, कुटुंबातील एकूण सदस्यांची संख्या, वय, पत्ता यासारख्या अनेक बाबी एकत्र करुन डाटाबेस तयार केला जातो. कार्डधारकाचा मृत्यू किंवा आर्थिक स्थिती चांगली असल्याने कार्ड रद्द होण्याची शक्यता असते. सरकारकडून वेळोवेळी रेशन कार्डची पडताळणी केली जाते.
दरम्यान सरकारकडून काही दिवसांआधी संसदे माहिती देण्यात आली. त्यानुसार 2017 ते 2021 दरम्यान बनावट, अपात्र असे एकूण 2 कोटी 41 लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक यूपीतील रेशन कार्डांचा समावेश आहे. यामध्ये यूपीतील जवळपास 1 कोटी 42 कोटी रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत.