Valentine Day Love Story : जगभरात आज वेलेंटाईन डे (Valentine Day) साजरा केला जात आहे. या दिवसानिमित्त अनेक कपल आपल्या पार्टनर सोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून वेलेंटाईन डे साजरा करत आहेत. अशात काही लव्ह स्टोरी देखील समोर येत आहेत. अशीच एक लव्ह स्टोरी समोर आली आहे. या लव्हस्टोरीतील कपलची कहानी ऐकून तुम्ही देखील हेच म्हणाल, हेच खरं वेलेंटाईन! नेमकी ही लव्हस्टोरी (Love Story) काय आहे, हे जाणून घेऊयात.
ही लव्हस्टोरी धनबाद येथील रहिवासी इंदरपाल सिंह आणि त्याची पत्नी सतबिंदर कौर यांची आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये दोघेही लग्नाच्या (marriage) बेडीत अडकले होते. लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यानंतर हातावरील मेहंदी देखील उतरली नसताना पत्नी सतबिंदर कौरच्य़ा दोन्ही किडन्या खराब (kidney failure) झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर पती इंदरपालच्या पायाखालची जमीन सरकली होती. मात्र त्याने धीर सोडला नाही आणि तो शेवटपर्यंत तिच्यासाठी लढत राहीला.
सतबिंदर कौर हिची किडनी (kidney failure) खराब होण्यापूर्वी ती एका खासगी बँकेत काम करत होती. पण आजारपणामुळे तिची नोकरी गेली होती. तर पती इंदरपाल पत्नीच्या उपचारासाठी वेगवेगळ्या शहरात फिरत होता. त्यामुळे खासगी कंपनीत काम करत असल्यामुळे त्याला देखील नोकरी सोडावी लागली होती. असे असताना सेविंग आणि पीएफमधून काही रक्कम काढून त्यांना किडनी प्रत्यारोपण करावे लागले होते.
सतबिंदर कौरच्या आई-वडिलांनीच आपल्या मुलीची साथ सोडली होती. पत्नीची किडनी (kidney failure) निकामी झाल्यानंतर पती इंदरपालला घरी स्वयंपाक करण्यापासून रुग्णालयात पत्नीची पूर्ण काळजी घ्यावी लागली होती. या संपूर्ण प्रकरणामध्ये पत्नीचे वडील आणि भावाने आपल्या मुलीची आणि बहिणीची विचारपूस देखील केली नव्हती.
सतबिंदर कौरच्या आई-वडिलांनी साथ सोडली असली तरी सासू-सासऱ्यांनी मात्र त्यांना आधार दिला. इंदरपालच्या वडिलांना आणि आईलाही त्यांच्या सुनेसाठी किडनी दान (Kidney Donate) करायची होती. मात्र वडिलांचे वय आणि अशक्तपणाचा रुग्ण असल्याने डॉक्टरांनी तसे न करण्याचा सल्ला दिला. तर आईला मणक्याचा त्रास होता, त्यामुळे तिलाही किडनी दान करता आली नाही. दुसरीकडे, दुःखाची बाब म्हणजे सतबिंदर कौरच्या स्वतःच्या मोठ्या बहिणीने इंदरपालला तिला सोडून जाण्याचा सल्ला दिला होता. या संपूर्ण प्रकरणाची सुखद बाब म्हणजे दुसऱ्या घरातून आलेल्या सुनेला सासरच्यांनी स्वीकारलं होतं.
पती इंदरपालने किडनी दान (Kidney Donate) करण्याचा निर्णय घेतला. रक्तगट आणि डीएनए वेगवेगळे असूनही देखील मोठी जोखीम पत्करून इंदरपालने किडनी दान केले. पाच महिन्यांपूर्वी किडनी प्रत्यारोपण यशस्वी झाले. दोघेही आता पूर्णपणे निरोगी असून त्यांना कोणत्याही प्रकारची समस्या नाही.
दरम्यान या कठिण काळात इंदरपालच्या आई वडिलांची सतबिंदर कौरला खुप मदत झाली. इंदरपालचे वडील बीसीसीएलमध्ये काम करत होते, त्यांनीही मदत केली. तर विमा कंपन्यांच्या मदतीने किडनी प्रत्यारोपण (kidney transplant) यशस्वी झाले. या संपूर्ण प्रकरणामध्ये पत्नीच्या सासरच्या मंडळींनी खुप मोठं कर्तव्य पार पाडले आहे.ही घटना झारखंडमधील धनबाद येथे घडली आहे.