Viral Video of BMW: आपल्या देशात सर्वसामान्यांना अनेकदा कर भरुनही मुलभूत सुविधांसाठी झगडावं लागतं. यामध्ये जर एखाद्या समस्येने सर्वसामान्य अधिक ग्रासले असतील तर ते म्हणजे खराब रस्ते. रस्त्यांवर ठिकठिकाणी असणारे खड्डे, त्यामुळे होणारे अपघात हे म्हणजे आता नित्याचं झालं आहे. खड्डे बुजवले गेले तरी ते अशाप्रकारे बुजवले जातात की काही महिन्यात ते पुन्हा येतील. प्रशासन किती बेजबाबजदारपणे काम करतं हे दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान नेटकऱ्यांचा रोष पाहिल्यानंतर अखेर प्रशासनानेही कारवाई केली आहे.
गुरुग्रामच्या गोल्फ कोर्स रोडवरील एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. येथे एक स्पीड ब्रेकर अशा पद्धतीने बांधण्यात आला होता की, गाड्या अक्षरश: हवेत उडत होत्या. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने अखेर तिथे स्पीड ब्रेकर असल्याचा बोर्ड लावला आहे.
एक्सवर हा व्हिडीओ शेअऱ करण्यात आला आहे. व्हिडीओत दिसत आहे की, बीएमडब्ल्यू नव्याने बांधण्यात आलेल्या स्पीड ब्रेकरवरुन जाताना दिसत आहे. यावेळी बीएमडब्ल्यू वेगात होती. स्पीड ब्रेकरवरुन गेल्यानंतर ती अक्षऱश: हवेत उडते. स्पीड ब्रेकरवरुन ती इतक्या जोरात उडते की, जवळपास 15 फूट दूर जाऊन लँड होते. यानंतर तेथून दोन ट्रक जाताना दिसतात. त्यांनाही तिथे स्पीड ब्रेकर असल्याची कल्पना नसते. स्पीड ब्रेकरवर आदळल्यानंतर ट्रक जोरात आदळतो आणि त्यातील वाळूही बाहेर उडते.
Ouch!
This seems to have happened on a newly made unmarked speed breaker on golf course road in Gurugram!Got it in one of my groups. Damn!
Can anyone from Gurgaon confirm this pic.twitter.com/EZMmvq7W1f
— Bunny Punia (@BunnyPunia) October 28, 2024
काही वेळाने हा स्पीड ब्रेकर इतका चर्चेत येतो की, तिथे लोक गर्दी करताना आणि व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात करतात.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्पीड ब्रेकरवरुन तुफान टीका करण्यात आली याची दखल अखेर गुरुग्राम मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटीने (GMDA) ने घेतली. मंगळवारी रात्री उशिरा त्यांनी, त्यांनी 'पुढे स्पीड ब्रेकर' आहे असा सावधगिरीचा बोर्ड लावला.
दरम्यान हा स्पीड ब्रेकर रात्रीच्या अंधारात दिसावा यासाठी त्याला रंगही देण्यात आला आहे. जेणेकरुन चालक स्पीड ब्रेकर दिसल्यानंतर वाहनाचा वेग कमी कमी करतील आणि कोणताही अपघात होणार नाही.
गोल्फ कोर्स रोडवर DLF Camellias, Tulip Monsella, Golf Estate at M3M, आणि DLF Magnolias अशी अनेक आलिशान निवासस्थानं आहेत.