मुंबई : देशीतील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँकेच्या ग्राहकांना आता घर बसल्या बँकेची शाखा बदलता येणार आहे. घरबसल्या ग्राहक आता ऑनलाईन शाखा बदलू शकतात. त्यासाठी ग्राहकांना SBI बचत खात्यासाठी शाखा बदलायची असल्यास त्या शाखेचं ब्रांच कोड गरजेचं असणार आहे. शिवाय तुमचा मोबाईल नं रजिस्टर आणि ऑनलाईन बँकींग चालू असणं गरजेचं आहे.
ऑनलाईन शिवाय तुम्ही YONO ऍप किंवा YONO Liteच्या मदतीने देखील बँकेची शाखा बदलू शकता. तुमचा मोबाईल नंबर बँक अकाऊंटसोबत लिंक असणं गरजेचं आहे. कारण OTP शिवाय तुम्ही शाखा बदलू शकत नाही. कोरोना महामारी लक्षात घेत बँकेने जास्त काम ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे.
कशी बदलाल शाखा
- onlinesbi.com वर Log in करा.
- 'Personal Banking' हा पर्याय सिलेक्ट करा.
- User Name आणि पासवर्ड टाकूव इन्टर करा.
- त्यानंतर तुम्हाला 'e-service' टॅब दिसेल, त्यावर क्लिक करा.
- ट्रान्सफर सेविंग अकाऊंटवर क्लिक करा.
- त्यानंतर अकाऊंटला सिलेक्ट करा जिथे ट्रान्सफर करायचं आहे.
- ज्या बँकेत अकाऊंट ट्रान्सफर करू इच्छिता त्या ठिकाणचं IFSC कोड लिहा.
- सर्व माहिती निट आणि पूर्ण वाचल्यानंतर कन्फर्म करा.
- रजिस्टर्ड झाल्यानंतर तुमच्या मोबाईन नंबरवर OTP येईल.