मुंबई : सोशल मीडिया हे एक असं प्लॅटफॉर्म आहे, ज्यावर आपल्याला रोज नव-नवीन कंटेन्ट पाहायला मिळतात. ज्यामुळे लोकांचे मनोरंजन होत असतं. लग्न समारंभाचे व्हिडीओ पाहून आपण अनेकदा आपल्या जुन्या आणि आनंदी आठवणींना उजाळा देतो. यामुळेच कोणत्याही लग्न समारंभात व्हिडीओग्राफर प्रत्येक महत्त्वाचा प्रसंग कॅमेऱ्यात कैद करतो. सध्या या लग्नसोहळ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये वर आपल्या भावी वधूसोबत सार्वजनिक गैरवर्तन करताना दिसत आहे. स्टेजवर पुष्पहार घालण्याच्या वेळी वर भावी वधूसमोर उभा असल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. या प्रसंगी, वधू शांतपणे वराच्या समोर स्टेजवर उभी असते.
वधू-वर एकमेकांना हार घालत होते, विधी सुरू होत्या आणि अचानक वराने वधूला हार न घालता, तो तिच्यावरती फेकला. वराने केलेला हा खोडसाळपणा पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. वराच्या या वागण्याने तिथे उपस्थित प्रत्येकजण संतापले. हा वर असा का वागला हे काही कळले नाही. परंतु तो त्याच्या लग्नाला फारसा काही उत्सुक न दिसल्यामुळे असा अंदाज बांधला जाऊ शकतो की, त्याच्या मनाविरुद्ध हे लग्न होत असावं.
हा व्हिडीओ अधिकृत व्हायरल क्लिप इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे. आतापर्यंत 62 हजारांहून अधिक लोकांनी इंस्टाग्राम व्हिडीओला लाईक केले आहे. यूजर्स या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रकारे कमेंट देखील करत आहेत.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले की, 'बिचाऱ्या या गरीब वधूचा किती अपमान झाला आहे.' व्हिडीओ पाहिल्यानंतर आणखी एका यूजरने रागात म्हटले की, 'मी तिथे येऊन या वराला मारले तर तो ही तिथे उभा राहू शकणार नाही.' त्याचवेळी आणखी एका यूजरने सांगितले की, भारतात लग्नादरम्यान अशी घटना घडणे सामान्य आहे.